
अकोला : ग्रामपंचायत पोटनिवडणुकीसाठी २३ उमेदवारांचे अर्ज दाखल
अकोला : राज्य निवडणूक आयोगाने जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या रिक्त झालेल्या पदांच्या पोटनिवडणुकीचा कार्यक्रम घोषित केला असून जिल्ह्यातील १२५ ग्रामपंचायतींमध्ये २०७ रिक्त पदे आहेत. या रिक्त जागांसाठी उमेदवारी दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत २३ जणांचे उमेदवारी अर्ज दाखल झाले असून बहुतांश जागा या अविरोध होणार आहेत.
जिल्ह्यातील सात तालुक्यांतील १२५ ग्रामपंचायतींच्या २०७ रिक्त जागांसाठी पोटनिवडणुकीचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. संबंधित ग्रामपंचायतींसाठी नामनिर्देशन पत्र भरण्याची प्रक्रिया १३ मे पासून सुरू झाली असून २० मे अखेरच्या दिवसापर्यंत २३ उमेदवारांनी अर्ज दाखल केले.
संबंधित नामनिर्देशनपत्रांची छाननी सोमवारी करण्यात येईल, तर २५ मे रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत नामनिर्देशनपत्रे मागे घेता येतील. तसेच निवडणूक चिन्ह नेमून देण्याचा तसेच अंतिमरित्या निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी प्रसिद्धी करण्याची तारीख २५ मे दुपारी ३ वाजतानंतर असून आवश्यकता असल्यास ५ जून रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत मतदान घेण्यात येईल. तर ६ जून रोजी मतमोजणी करण्यात येईल. ९ जून रोजी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत निवडणूक निकालाची अधिसूचना प्रसिद्ध करण्यात येईल.
Web Title: Akola Gram Panchayat By Election 23 Candidates Filed Applications
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..