
Akola News: ग्रामपंचायत पोटनिवडणुकांसाठी मतदारयादी कार्यक्रम घोषित
Akola News: राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार, राजीनामा, अनर्हता किंवा अन्य कारणांमुळे ग्रामपंचायतीतील सदस्य किंवा थेट सरपंचाच्या रिक्त झालेल्या जागांच्या पोटनिवडणुकांसाठी मतदार याद्यांच्या कार्यक्रम राबवावयाचा आहे. त्यासाठी मतदार यादी कार्यक्रम आयोगाने घोषित केला आहे.
जिल्ह्यात ५८ ग्रामपंचायतींमधील ७२ सदस्यपदांच्या रिक्त जागांसाठी तर थेट सरपंचपदाच्या पाच पदांसाठी निवडणुका होणार आहेत. त्यात तेल्हारा तालुक्यात ५ ग्रामपंचायतींचे ५ सदस्य, अकोट तालुक्यात ६ ग्रापंचे दहा सदस्य (एक सरपंचपद), मूर्तिजापूर तालुक्यात १३ ग्रा.पं.चे १६ सदस्य, अकोला तालुक्यात ११ ग्रा.पं.चे १५ सदस्य (एक सरपंच पद),
बाळापूर तालुक्यात १२ ग्रा.पं. चे १७ सदस्य (एक सरपंचपद), बार्शीटाकळी तालुक्यात पाच ग्रा.पं.चे चार सदस्य (एक सरपंच पद), पातूर तालुक्यात सहा ग्रा.पं.चे पाच सदस्य (एक सरपंचपद) याप्रमाणे समावेश आहे, अशी माहिती उपजिल्हाधिकारी तथा प्रभारी अधिकारी ग्रापं, जिप, पंस निवडणूक विभाग सदाशिव शेलार यांनी दिली.
असा आहे कार्यक्रम
प्रभागनिहाय प्रारुप मतदार यादी प्रसिद्धी -
शुक्रवार २४ फेब्रुवारी २०२३
हरकती व सूचना दाखल करण्याचा कालावधी -
शुक्रवार २४ फेब्रुवारी ते गुरुवार २ मार्च २०२३.
प्रभागनिहाय अंतिम मतदार यादी प्रसिद्धी -
गुरुवार ९ मार्च २०२३.