Akola Nwes : निधी वाटपात भाजपच्या मतदारसंघाला झुकते माप, विरोधकांचा दावा

राज्यात झालेल्या सत्तांतरणानंतर निधी वाटपाचे चित्र बदलले असून भाजप आमदार असलेल्या मतदारसंघात झुकते माप देण्यात येत आहे
Akola Gram Sadak Yojana Funding News
Akola Gram Sadak Yojana Funding Newsesakal

Akola : राज्यात झालेल्या सत्तांतरणानंतर निधी वाटपाचे चित्र बदलले असून भाजप आमदार असलेल्या मतदारसंघात झुकते माप देण्यात येत आहे, तर शिवसेनेच्या मतदारसंघात मात्र तोडका निधी देण्यात येत असल्याचा दावा विरोधकांकडून करण्यात येत आहे. मुख्यमंत्री ग्राम सडक याेजनअंतर्गत मंजूर निधी व कामांवरुन याबाबत शिक्कामोर्तब होत असल्याचे दिसून येत असल्याचाही दावा होत आहे.

ग्रामीण भागातील रस्त्यांची दर्जोन्नती व डागडुगी करण्यासाठी प्रत्येक वर्षी शासनामार्फत मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून निधी देण्यात येतो. या निधीतून दुरावस्था झालेले रस्ते चांगले करण्यात येतात. रस्त्यांसाठी निधी वितरण करताना भाैगाेलिक स्थिती, लाेकसंख्येचा विचार व रस्त्यांची उपयोगिता याचा विचार करणे अपेक्षित असल्याचे जाणकारांचे मत आहे.

मात्र राजकीय साेय लक्षात घेऊनच विविध विकास नियाेजन करण्यात येत असल्याचे चित्र गत काही दिवसांपासून राज्यात सुरू आहे. सत्तांतराआधी महाविकास आघाडी सरकारच्या काळात जिल्ह्यात सर्वाधिक विकास निधी, कामे, याेजना शिवसेनेचे मतदारसंघात मंजूर करण्यात आल्या.

अशातच गतवर्षी जून महिन्यात सत्तांतरण झाले आणि कामांच्या वितरणाचे चित्र बदलले आणि सर्वाधिक कामे भाजपच्या ताब्यात असलेल्या चार मतदारसंघात मंजूर हाेत असल्याचे विराेधकांचे म्हणणे आहे.

असे आहे निधी वितरणाचे चित्र

भाजप मतदारसंघ : अकाेला पूर्व, पश्चिम, अकाेट व मूर्तिजापूर विधानसभा मतदारसंघात एकूण ८१. २४० कि.मी.च्या रस्त्यांसाठी ६६ काेटींच्या रस्त्यांना मान्यता देण्यात आली. यात माराेडी ते लाखाेंडा (३ काेटी ४३ लाख), कराेडी फाटा ते पानेट (१ काेटी ७१ लाख),टाकळी ते हनवाडी (६ काेटी ३६ लाख),चाेहाेट्टा बाजार-नखेगाव-पिलकवाडी (३ काेटी २४ लाख)

धनवाडी-वरूळ जऊळका (८ काेटी ८लाख), आसेगाव ते वाडनेर गंगाई (५ काेटी ३३ लाख), वाई आकाेलाखेड (३ काेटी २५ लाख), वाई अंबाेडा(२ काेटी ९७ लाख), सररपूर (१ काेटी ४८ लाख),उमरशेवडी ते पिंपरखेडी ते वारी भैरवगड(५ काेटी ६६ लाख),माेहखेड(९४ लाख)

दुधलम ते धाेत्रा निंभा धानाेरा पाटेकर विराहित- (१२ काेटी ७८ लाख), कंझरा ते धानाेरा (२ काेटी ४२ लाख), शेलू वेताळ (३ काेटी १ लाख), धानाेराे पाटेकर ते राजुरा घाटे (५ काेटी ३२ लाख) या रस्त्यांचा समावेश आहे.

Akola Gram Sadak Yojana Funding News
Road Construction Fund : रस्त्यासाठी 200 कोटीची घोषणा, मिळाले 14 कोटीच; शासनाच्या निधीची प्रतिक्षा
Akola Gram Sadak Yojana Funding News
Akola Crime : तहसीलदार, मंडळ अधिकाऱ्याला जीवे मारण्याचा प्रयत्न

शिवसेना मतदारसंघ : विधानसभेचा बाळापूर मतदारसंघ शिवसेनेच्या (उद्धव ठाकरे गट) ताब्यात आहे. बाेराळे ते व्याळा या रस्त्यांसाठी ४ काेटी ३६ लाख रुपयांच्या कामाला प्रशासकीय मंजुरी प्रदान करण्यात आली आहे. रत्यांची लांबा ४.४०० कि.मी. आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com