esakal | Akola : वरदान प्रकल्प शतकाच्या उंबरठ्यावर
sakal

बोलून बातमी शोधा

Akola : वरदान प्रकल्प शतकाच्या उंबरठ्यावर

Akola : वरदान प्रकल्प शतकाच्या उंबरठ्यावर

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

हिवरखेड : अकोला जिल्ह्यातील वारी येथील हनुमान सागर वान धरण हे जवळपास ९९ टक्के भरले असून, शनिवारी (ता.२) वान प्रकल्पाचे एकूण दोन वक्रद्वारे उघडली असून, नदीपात्रात मोठा विसर्ग सोडण्यात आला आहे.

पाण्याची आवक पाहून विसर्ग वाढविणे-कमी करणेबाबत पुढील निर्णय घेण्यात येईल. तरी, नदी काठच्या गावांतील नागरिकांनी सावध राहावे असा, इशारा वान प्रकल्प, पूर नियंत्रण कक्षाने दिला आहे.अकोला व बुलडाणा जिल्हाला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा या धरणातून होत असतो. त्यामुळे यंदाही पिण्याच्या पाण्याची परिसरातील नागरिकांची चिंता मिटली आहे. अकोला, अमरावती, बुलडाणा या तीन जिल्ह्यांच्या सीमेवर हिवरखेड पासून जवळच असलेल्या वारी हनुमान येथे वान नदीवर ‘वान प्रकल्प’ हे धरण आहे. येथील जलाशयाला हमूमान सागर असे नाव दिले आहे. प्रकल्पातील शुद्ध पाण्याने अकोला, बुलडाणा जिल्ह्यातील शेकडो गावे आणि शहरातील लक्षावधी जनतेची तहान वर्षानुवर्षांपासून भागत आहे. पाण्याच्या सिंचनातून हजारो शेतकऱ्यांचे हरितक्रांतीचे स्वप्न पूर्ण झाले आहे. त्यामुळे वान प्रकल्पाला ‘वरदान प्रकल्प’ म्हणून ओळखले जाते. एखादा अपवाद वगळता हे धरण दरवर्षी शंभर टक्के पूर्ण भरते.

यंदा पावसाळा सुरू होण्यापूर्वीच या धरणात मागील वर्षीचा सुद्धा मोठा जलसाठा शिल्लक होता. अकोला जिल्ह्यात यावर्षी चांगला पाऊस झाला असला तरी, या धरणाच्या पाणलोट क्षेत्रात म्हणजेच सातपुडा पर्वतातील मेळघाट क्षेत्रात आतापर्यंत समाधानकारक पाऊस झाला नव्हता त्यामुळे यंदा ‘वरदान प्रकल्प’ भरते की, नाही अशी चिंता शेतकरी बांधवांसह सर्वांनाच लागली होती. परंतु, गत सात- आठ दिवसात सातपुडा पर्वतात जोरदार पाऊस सुरू असल्याने धरणाचा जलसाठा तीव्र गतीने वाढ होणे सुरू झाले आहे. आतापर्यंत जलसाठा ९९ टक्केवर पोहोचला आहे. पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस सुरू असून, हवामान खात्याच्या अंदाजानुसार आणखी काही दिवस जोरदार वृष्टी होणार आहे. त्यामुळे यावर्षी सुद्धा वारी हनुमान सागर पूर्णता भरले आहे.

वान धरण पूर्णतः भरून अनेकदा पाणी सोडल्या जात असल्याने वान नदीचे पात्र खळाळून वाहत आहे. त्यामुळे हजारो पर्यटकांचा ओढा वारी हनुमानकडे असून, पर्यटक विहंगम दृश्याचा आनंद घेत आहे.

-विलास देऊळकार, माजी सैनिक, हिवरखेड.

loading image
go to top