

Akola News
esakal
अकोला: मे महिन्याच्या अखेरीस विदर्भात उष्णतेची तीव्रता आणखी वाढली असून अकोल्यासह संपूर्ण परिसर अक्षरशः होरपळून निघत आहे. नागपूर येथील प्रादेशिक हवामान विभागाने १८ ते २३ मे दरम्यान अकोला आणि विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये उष्णतेची लाट (हीटवेव्ह) राहण्याचा इशारा दिला आहे.
अकोल्यात सोमवारी (ता.१८) कमाल तापमान ४६.३ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचल्याने नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने नागरिकांना आवश्यक ती काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.