Akola : अतिवृष्टीचा निधी तहसिलदारांच्या खात्यात वर्ग | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Akola

Akola : अतिवृष्टीचा निधी तहसिलदारांच्या खात्यात वर्ग

अकोला : जिल्ह्यात झालेल्या संततधार पाऊस, अतिवृष्टी व पूरपरिस्थितीमुळे शेतीपिकांच्या नुकसानीसाठी अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना १३० कोटी ९ लाख ५३ हजार रुपयांचा निधी विभागीय आयुक्त यांच्या आदेशानुसार जिल्ह्यास प्राप्त झाला आहे. हा निधी विविध लेखाशीर्षाखाली संबंधित तहसिलदारांच्या खात्यात वर्ग करण्यात आला आहे. त्यामुळे मदत निधीचे वितरण लवकरच शेतकऱ्यांना करण्यात येईल.

जून, जुलै महिन्यात जिल्ह्यात जोरदार पाऊस झाला. बाळापूर व अकोला तालुक्यात पावसामुळे शेतीचे सर्वाधिक नुकसान झाले. नदी, नाल्यांचे पाणी शेतात शिरल्याने काही भागातील शेती खरडून गेली. त्यामुळे आधीच हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांचे या नुकसानामुळे कंबरडेच मोडले. २१ जुलैपर्यंत ३५५.१ मि.मी. (५१.६ टक्के) पावसाची नोंद झाली. शेती पिकांमध्ये कापूस, सोयाबीन, ज्वारी, मूंग, उडीद, भाजीपाला या पिकांना अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका बसला.

ऑगस्ट महिन्यात सुद्धा जोरदार पाऊस झाल्याने पुन्हा एकदा शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले. आठ ते ११ ऑगस्ट दरम्यान झालेल्या अतिवृष्टीमुळे फळ पिकांचे नुकसान झाले. परिणामी नुकसानीचा प्राथमिक त्यानंतर अंतिम अहवाल तयार करण्यात करून शासनाला पाठवण्यात आला होता. त्यानुसार शासनाने शेती नुकसानीसाठी निधी मंजूर केला आहे. सदर निधी जिल्ह्याला प्राप्त झाल्यानंतर त्याचे वितरण लवकरत लवकर व्हावे, यासाठी सदर निधी तहसिलदारांच्या खात्यात वर्ग करण्यात आला आहे.

असा आहे वर्ग करण्यात आलेला निधी

तालुका निधी

अकोला ४९ कोटी ३१ लाख ५३ हजार

बार्शीटाकळी २९ लाख २४ हजार

अकोट १९ कोटी ७५ लाख २४ हजार

तेल्हारा ३ कोटी २३ लाख ७२ हजार

बाळापूर ५३ कोटी ८८ लक्ष २१ हजार

मूर्तीजापूर ३ कोटी ६१ लाख ५९ हजार

Web Title: Akola Heavy Rain Tehsildar Farmer Agriculture Land Crops

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..