

Trusted Friend Turns Thief
Sakal
अकोला : पोलिसांच्या सतर्क तपसामुळे ५.३२ लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल सुरक्षितपणे परत मिळाला आहे. विशेष म्हणजे ही चोरी फिर्यादीच्या मुलाच्या मित्रानेच केल्याचे उघडकीस आले. घटना १७ ऑक्टोबर २०२५ रोजीची आहे. विश्वमानव मंदिर, बालाजी नगर येथील फिर्यादी कुटुंबासह बाहेरगावी गेले होते. या दरम्यान फिर्यादीच्या मुलाचा मित्राने संधी साधून घरात प्रवेश केला. घरातील आलमारीमध्ये ठेवलेले सोन्याचे दागिने शोधून काढत त्याने सर्व दागिने चोरून नेले.