Akola District Homeguard Office
sakal
अकोला - पोलिसांच्या खांद्याला खांदा लावून सण-उत्सव, धार्मिक मिरवणुका, गणेशोत्सव तसेच विविध बंदोबस्ताच्या ठिकाणी प्रामाणिकपणे कर्तव्य बजावणाऱ्या अकोला जिल्ह्यातील सुमारे ९०० होमगार्ड बांधवांचे मागील चार महिन्यांपासून मानधन थकीत असल्याची माहिती आहे. नियमितपणे कर्तव्य बजावूनही मानधन वेळेवर मिळत नसल्याने या जवानांसमोर आर्थिक अडचणी निर्माण झाल्या आहेत.