Akola News : अकोल्यात सर्वोपचार रुग्णालयातील भोजन निकृष्ट दर्जाचे; रुग्णांना सडलेली फळे व अंडी!

Hospital food : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय संलग्नित सर्वोपचार रुग्णालयात रुग्णांना दिल्या जाणाऱ्या भोजनाच्या दर्जाबाबत गंभीर तक्रारी समोर आल्या असून या संदर्भात रुग्णालय प्रशासनाविरोधात वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी अधिष्ठाता यांना निवेदन दिले आहे.
Patients at Akola hospital served rotten fruits and eggs

Patients at Akola hospital served rotten fruits and eggs

sakal

Updated on

अकोला : रुग्णांना मिळणाऱ्या अन्न, चहा, नाश्ता याबाबत वारंवार तक्रारी होत असून, अनेकदा मौखिकरित्या निदर्शनास आणून दिल्यानंतरही प्रशासनाकडून कोणतीही कार्यवाही न झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. रुग्णांना सकाळचा चहा सर्व वार्डांमध्ये न मिळता केवळ काहीच वार्डांमध्ये दिला जातो. रुग्णालयातील वार्ड क्र.१४ तसेच सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमधील सारीचा वार्ड आणि जळालेल्या रुग्णांच्या वार्डमध्ये सडलेली सफरचंदे व अंडी रुग्णांना देण्यात आली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com