Akola: पत्नीला लाकडाने बेदम मारहाण करून तोडले हात-पाय | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

crime news

अकोला : पत्नीला लाकडाने बेदम मारहाण करून तोडले हात-पाय

बाळापूर : जेवणात वरुन नवरा बायकोचा वाद विकोपाला गेला व रागाच्या भरात पतीला पत्नीला लाकडाने बेदम मारहाण करून गंभीर जखमी केले. ही घटना बाळापूर शहरातील लोटनापूर भागात आज गुरुवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास घडली असून गंभीर पत्नीला सर्वोपचार रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.

या मारहाणीत पत्नीचे दोन्ही पाय व एक हात मोडल्याने तीला तातडीने अकोला येथे हलविण्यात आले आहे. वृत्त लिही पर्यंत या प्रकरणात बाळापूर पोलिस ठाण्यात कुठल्याही प्रकारची नोंद करण्यात आली नव्हती.

हेही वाचा: सोलापूर : कचरा न देणाऱ्या नागरिकांवर होणार आता दंडात्मक कारवाई

प्राप्त माहितीनुसार, बाळापूर शहरातील लोटनापूर भागात वास्तव्यास असलेल्या एका कुटुंबात जेवणात वरुन दोघे पती-पत्नी मध्ये काही कारणावरून वाद झाला. यावेळी पतीचा राग अनावर होत पत्नीला लाकडाने दोन्ही पायावर व एका हातावर जबर मारहाण केली.सदर मारहाणीत दोन्ही पायाची व हाताची हाडे मोडल्या गेली आहेत. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या पत्नीला अकोला येथील सर्वोपचार रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या दाम्पत्याला एक सहा वर्षे वयाच्या मुलगा असून यापुर्वी तीचा पती या मुलाला घेऊन पळून गेला होता. त्यामुळे सदर महीलेने बाळापूर पोलिस ठाण्यात धाव घेतली. बाळापूर ठाणेदार दत्तात्रय आव्हाळे यांनी सदर मुलाला शोधून महीले कडे दिले होते.

आज या पतीने पत्नीला जबर मारहाण करून राक्षसी प्रवृत्तीचा कळस गाठला आहे.

टॅग्स :Akolacrime