Solapur: कचरा न देणाऱ्या नागरिकांवर होणार आता दंडात्मक कारवाई | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

घंटागाड्या

सोलापूर : कचरा न देणाऱ्या नागरिकांवर होणार आता दंडात्मक कारवाई

सोलापूर : शहरातील सार्वजनिक स्वच्छतागृहांच्या जिओ टॅगिगनंतर आता महापालिका ओला व सुका कचरा विलगीकरणावर अधिक भर देणार आहे. शहरातील कचरा पाईंट कमी करण्याच्या दृष्टीने नियम कडक करण्यात येत आहेत. कचरा रस्त्यावर टाकल्यास ५०० रुपयांचा दंड आहे. आता रोजच्या रोज कचरा न देणाऱ्यांवर देखील ५०० रुपये दंड आकारण्यात येणार आहे. त्यासाठी महापालिका प्रशासनाने विभागीय कार्यालयातील एसआय यांची बैठक घेऊन सूचना देण्यात आल्या आहेत.

स्वच्छ भारत मिशनअंतर्गत स्वच्छतागृहांच्या स्वच्छतेसाठी ऑनलाइन ॲपच्या आधारे कामकाजात पारदर्शकता आणण्याचा प्रयत्न महापालिकेने केला आहे. आता घनकचरा व्यवस्थापनांतर्गत शहर कचरामुक्‍त करण्यासाठी महापालिका उपाययोजना करीत आहे. घरोघरी, सोसायटीमधील कचरा संकलन करण्याबरोबर तो ओला व सुका असा विलगीकरण करूनच घेण्यावर अधिक भर दिला जाणार आहे. त्यासाठी आवश्‍यक यंत्रणा महापालिकेकडून अद्ययावत करण्यात येणार आहे.

हेही वाचा: सावधान! रेड झोन मधील या जिल्ह्यात मास्क न वापरल्यास होणार दंडात्मक कारवाई

सोसायट्यांमध्ये जनजागृती करणे, अस्थापनधारकांची बैठक घेणे, संबंधित परिसरातील कचरा पाईंट कमी करण्यासाठी जनजागृती करणे आदी प्रबोधनपर उपक्रमातून कचरा विलगीकरणाबाबत नागरिकांची सकारात्मक मानसिकता वाढीस लावण्यासाठी विभागीय कार्यालयातून कामकाज होण्यासाठी संबंधितांना सूचना देण्यात आल्या आहेत. त्यासाठी आवश्‍यक यंत्रणा खरेदी करणे आदींचे नियोजन महापालिकेकडून केले जात आहे. ओला व सुका कचरा विलगीकरणयुक्‍त

असलेल्या नव्या ३२ गाड्या खरेदी करण्यात येणार आहेत. शहरातील प्रत्येक कचरापाईंट जीओ टॅगद्यारे जोडून तेथे वृक्षारोपण उपक्रम हाती घेण्यात येणार असल्याचेही प्रशासनाकडून सांगण्यात आले.

आकडे बोलतात

शहरातील रोजचा कचरा

२७५ ते ३०० टन

एकूण घंटागाड्या

२२५

नव्याने खरेदी होणाऱ्या गाड्या

३२

स्वच्छतेसाठीचे कर्मचारी

१ हजार ६००

हेही वाचा: सोलापूर : बार्शीत भरदिवसा वृद्ध महिलेला लुटले

शहर कचरामुक्‍त करण्यासाठी ओला व सुका कचरा विलगीकरण, सिग्रेशन प्रक्रिया आदी उपक्रम राबविणे गरजेचे आहे. कचरा रस्त्यावर टाकू नये यासाठी आपण दंड आकारत आहे. रोजच्या रोज कचरा न देणाऱ्यांवरही आता दंडात्मक कारवाई करून शहरातील कचरापाईंट कमी करण्यासाठी प्रयत्न राहणार आहे.

- धनराज पांडे, उपायुक्‍त, महापालिका

टॅग्स :Solapur