
अकोला : वाळू वाहून नेणाऱ्या टँकर चालकाचा शासकीय पथकावर हल्ला
मूर्तिजापूर - वाळू तस्करीवर लक्ष ठेवण्यासाठी नियुक्त येथील तहसील कार्यालयाच्या एका पथकाच्या वाहनाला वाळू वाहून नेणाऱ्या ट्रॕकर चालकाने सोमवारी रात्री पळून जाण्याच्या प्रयत्नात धडक दिली.
वाळूची अवैध वाहतूक करण्यांवर टाच आणण्यासाठी जिल्ह्यात सर्वत्र कारवाई सुरू असून, वाळूची तस्करी रोखण्यासाठी पथके तहसील कार्यालयाने तयार केली आहेत. त्यापैकी गौण खानिज कारवाई पथक (क्रमांक१६) टेहेळणीकरिता फिरत असताना त्या पथकास वाळू वाहून नेणारा ट्रॕकर दिसला. त्या हुलकावणी देणाऱ्या ट्रॕकरचा खापरवाड्यापासून दोन तास पाठलाग करणाऱ्या पथकास अखेर रात्री २ वाजता टिपटाळा शिवारातील एका शेतात वाळू टाकून पळ काढणाऱ्या ट्रॕकर (ट्रॉली क्रमांक एमएच३० जे२६७५) च्या चालकाने ट्रॕकर मागे घेतांना शासकीय वाहनास धडक देऊन कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करून ट्रॕकर चालकाने तिघा सहकाऱ्यांसह पळ काढला. त्यामुळे शासकीय वाहनाचे नुकसान झाले, जिवितहानी झाली नाही, मात्र पथकातील कर्मचारी धास्तावले.
पथकातील तलाठी अन्वेश खडसे आज सकाळी १० वाजता ग्रामीण पोलिस ठाण्यात व तेथून माना पोलिस ठाण्यात गेले. माना पोलीस स्थळ पंचनाम्यासाठी जाऊन त्यांच्या हद्दीतील हा प्रकार नसून, ग्रामीणच्या हद्दीतील असल्याचे सांगून परतले. ग्रामी पोलीस ठाण्यातही त्यांना स्थळ पंचनामा करण्यासाठी जाण्याचे सांगण्यात आले. वृत्त लिहीपर्यंत स्थळ पंचनामा करणारे परतले नव्हते. रात्रभर जागून दिवसभर या पोलीस ठाण्यातून त्या पोलीस ठाण्यात हेलपाटे घेणारे संबंधित कर्मचारी पार दमून गेले. गौण खनिजाची तस्करी करणाऱ्यांवर कारवाई करतांना भेदभाव होऊ नये, अशी अपेक्षाही या निमित्याने उमटली.
Web Title: Akola Illegal Sand Smuggling Tanker Driver Attack Government Convoy
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..