अकोला : सुपर स्पेशालिटीमध्ये वैद्यकीय यंत्रांचे इंस्टॉलेशन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सुपर स्पेशालिटी रुग्णालय

अकोला : सुपर स्पेशालिटीमध्ये वैद्यकीय यंत्रांचे इंस्टॉलेशन

अकोला - स्थानिक नीमवाडी येथील सुपर स्पेशालिटी रुग्णालयाचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडे (जीएमसी) हस्तांतरण झाल्यानंतर रुग्णालयासाठी आवश्यक असलेल्या मनुष्यबळाची भरती स्थानिक स्तरावर जीएमसीमार्फत करण्यात येत आहे. त्यापैकी सहा स्पेशालिस्ट डॉक्टर व सहा सिनियर रेसिडन्ट डॉक्टरांची नियुक्ती करण्यात आली असून संबंधितांमार्फत सुपर स्पेशालिटी रूग्णालयात वैद्यकीय यंत्रसामग्रीचे इंस्टॉलेशन करण्यात येत आहे. दुसरीकडे सुपरस्पेशालिटीसाठी आवश्यक असलेल्या ४६ वार्ड बॉयच्या नियुक्तीसाठीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून ४० सफाई कर्मचारी नियुक्तीची प्रक्रिया पूर्ण झाली आहे.

रुग्णांना योग्य दर्जाच्या आरोग्य सुविधा मिळाव्यात यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालयांतर्गत राज्यात चार सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलला मान्यता देण्यात आली होती. हॉस्पिटलच्या निर्माण कार्यासाठी जानेवारी २०१४ मध्ये केंद्र व राज्य सरकारकडून कोट्यवधींचा निधी मंजूर करण्यात आला होता. त्यानुसार, अकोल्यासह औरंगाबाद, लातूर आणि यवतमाळ या चारही ठिकाणी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या बांधकामाला सुरुवात झाली.

सदर चारही इमारतींपैकी अकोल्यातील इमारतीचे बांधकाम पूर्ण झाले आहे; परंतु अद्यापही या ठिकाणी आवश्यक पदांना मंजुरी मिळाली नव्हती. परंतु गत काही महिन्यांपूर्वी शासनाने पदनिर्मितीला मंजुरी दिली आहे. त्यादृष्टीने सदर पदभरतीची प्रक्रिया राज्य शासनाकडून लवकरच राबविण्यात येणार होती. परंतु शासनामार्फत अद्याप यासंदर्भात ठोस कार्यवाही करण्यात येत नसल्याने रुग्णालयाचे काम पूर्ण झाले असले तरी उद्‍घाटन मात्र रखडले आहे. दरम्यान जीएमसी प्रशासनामार्फत सहा विशेषज्ञ डॉक्टर व सहा सिनियर रेसिडेंट डॉक्टरांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे संबंधित डॉक्टरांनी वैद्यकीय यंत्रसामग्रीचे इंस्टॉलेशन करण्यास सुरुवात केली आहे.

Web Title: Akola Installation Of Medical Devices In Super Specialty

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..