Officials of the Anti-Corruption Bureau during a trap operation related to an intercaste marriage incentive
Sakal
अकोला : शासनाच्या आंतरजातीय विवाह प्रोत्साहनपर अनुदान योजनेअंतर्गत मिळणारे ५० हजार रुपयांचे अर्थसहाय्य मंजूर करून देण्यासाठी ५ हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी जिल्हा परिषद, अकोला येथील समाजकल्याण विभागाचा एजंट म्हणून काम करीत असलेला शैलेंद्र तुळशीराम बगाटे (खाजगी शिक्षक) यास अॅन्टी करप्शन ब्युरो (एसीबी) अकोलाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. ही कारवाई मंगळवारी (दि. १७) करण्यात आली.