Akola : पूर्णेच्या पाण्याने राजराजेश्वराला जलाभिषेक

हर बोला हर हर महादेव शेकडो पालखी-कावडचा सहभागी
akola
akolasakal

अकोला : श्रावणातील शेवटच्या सोमवारी अकोल्याचे ग्रामदैवत श्री राजराजेश्वर शिव मंदिरात शेकडो पालखी व कावडधारींनी गांधीग्राम (वाघोली) येथून पूर्णा नदीचे पाणी कावडद्वारे आणून महादेवाच्या पिंडीला जलाभिषेक केला.

अकोला शहरातील जुने शहर परिसरात श्री राजराजेश्वर मंदिर आहे. या मंदिरात गेले ७९ वर्षांपासून पूर्णा नदीचे पाणी कावडद्वारे अकोला येथे आणून या पाण्याने मंदिरातील पिंडीवर जलाभिषेक केला जातो. यावर्षी १५० वर पालखी व तेवढ्याच कावडद्वारे पूर्णा नदीचे पाणी आणून उत्साहात जलाभिषेक करण्यात आला.

संपूर्ण अकोला शहर या उत्सवाच्या निमित्ताने भक्तीमय झाले होते. ‘हर बोला हर हर महादेवा’च्या जयघोषात तब्बल १८ किलोमीटरवरून शेकडो भरण्यांची कावड खांद्यावर उचलून आणत अकोल्यातील राजराजेश्वर मंदिरात जलभिषेक करण्यात आला.

akola
Akola Rain News : पावसाच्या आगमनाने पिकांना मिळाली नवसंजीवनी

रविवारी रात्री गांधीग्रामकडे रवानाने झालेले भाविक सोमवारी सकाळी अकोला शहरात कावड-पालखी घेवून दाखल झाले. यावर्षी मानाची पालखी श्री राजराजेश्वर मंडळाची पालखी तीन तास उशिरा अकोल्यात दाखल झाली. यावेळी आमदार रणधीर सावरकर यांनी मानाच्या पालखीचे पूजन करून कावड-पालखी यात्रेला सुरुवात केली.

akola
Solapur News : हत्ती दरवाज्यातून येण्या-जाण्याचा पर्यटकांना मिळणार आनंद

त्यानंतर पहिली कावड डाबकी रोडवरील बाभळेश्वर मंडळाची दुपार १.३० वाजतानंतर राजराजेश्वर मंदिरात पोहोचली. हा सोहळा डोळ्यात सामावून घेण्यासाठी अकोला शहरातील लाखो भाविकांनी पालखी मार्गावर एकच गर्दी केली होती. शेवटचा श्रावण सोमवार असल्याने दर्शनासाठी मंदिरातही हजारो भाविक दाखल झाले होते. रात्री उशिरापर्यंत कावड-पालखी सोहळा सुरू होता.

सर्वात मोठी ७०० भरण्याची कावड

अकोला शहरातील कावड-पालखी सोहळ्याचे यावर्षीचे वैशिष्ठ म्हणजे सर्वात मोठ्या कावडमध्ये ७०० भरणे होते. या ७०० भरण्यात २१०० पेक्षा अधिक सदस्यांनी पूर्णा नदीवरून १८ किलोमीटर पायी चालत पाणी भरून अकोला शहरातील राजराजेश्वर मंदिरात जलाभिषेक केला. यावेळी भाविकांचा उत्साह बघण्यासारखा होता.

राम मंदिरासह विविध देखावे

राजराजेश्वर मंदिराच्या पालखी-कावड यात्रेत विविध मंडळांकडून वेगवेगळे देखावे सादर करण्यात आले होते. त्यात अयोध्या येथे उभारण्यात येत असलेल्या राम मंदिराचा देखावा सर्वांते लक्ष वेधून घेणारा ठरला. हा देखावा जय भवानी मित्र मंडळ ग्रुपतर्फे सारकारण्यात आला होता.

akola
Solapur News : मंगळवेढ्यात जि.प.कर्मचाऱ्याचे कामबंद आंदोलन

अनेकांनी जपला सेवाभाव

पालखी-कावड मार्गावर अनेकांनी सेवाभाव जपला. सोहळ्यात सहभागी झालेल्या पालखी व कावडधारींसाठी जागोजागी फराळ, पिण्याचे पाणी, फळं आणि महाप्रदासाची व्यवस्था विविध मंडळ, संस्थांकडून करण्यात आली होती. राजकीय पक्षांकडूनही कावडधारींचे शाल, श्रीफळ देवून स्वागत करण्यात आले. या वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲड. प्रकाश आंबेडकर यांचाही सहभाग होता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com