अकोला : 'पाणीपुरवठा' योजनांसाठी ५७६ कोटी निधी

जलजीवन मिशन : आतापर्यंत पाच योजनांना मंजुरी; ३८५ गावांना मिळणार शुद्ध पाणी
Akola Jaljivan Mission fund approved water supply scheme
Akola Jaljivan Mission fund approved water supply schemesakal

अकोला : कायम दुष्काळी जिल्हा म्हणून अकोल्याची ओळख आहे. खारपाणपट्ट्यात अर्धाधिक जिल्हा मोडत असल्याने या जिल्ह्यात पिण्याच्या पाण्याची कायम टंंचाई असते. ही निकड ओळखून अकोला जिल्ह्यात जलजीवन मिशन अंकर्गत आतापर्यंत पाच पाणीपुरवठा योजनांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. त्यासाठी ५७६ कोटीचा निधी मंजूर करण्यात आल्याने जिल्ह्यातील ३८५ गावांना शुद्ध पाणीपुरवठा करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

अकोला जिल्ह्यातून वाहणाऱ्या पूर्णा नदीच्या काठावरील चार तालुक्यातील परिसर हा खारपाणपट्ट्यात येतो. त्यात अकोला, अकोट, तेल्हारा व बाळापूरचा समावेश आहे. या चारही तालुक्यात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायम भेडासावत असतो. त्यामुळे येथे कायम स्वरुपी उपाययोजना करणे आवश्यक होते. अस्थित्वात असलेल्या पाणीपुरवठा योजना या कालबाह्य झाल्याने त्या जागी नवीन योजना किंवा संपूर्ण दुरुस्तीसाठी निधीची आवश्यकता होती. ही निधी मंजूर करून घेण्यासाठी शिवसेना आमदार नितीन देशमुख, उपजिल्हा प्रमुख तथा जिल्हा परिषदेतील शिवसेनेचे गटनेते गोपाल दातकर यांनी प्रशासकीय मान्यता मिळविण्यासाठी मुंबईपर्यंत पाठपुरावा केला.

मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे व पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे केलेल्या पाठपुराव्यामुळे गेले दोन वर्षांत अकोला जिल्ह्यात ५७६ कोटीच्या एकूण पाच पाणीपुरवठा योजनांना प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. त्यामुळे चार तालुक्यातील एकूण ३८५ गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायम स्वरुपी सुटणार आहे. अकोला जिल्ह्याच्या इतिहासात एकच पंचवार्षिक योजनेत प्रथमच ग्रामीण भागातील पाणीपुरवठा योजनांसाठी एवढ्या मोठ्याप्रमाणावर निधी मंजूर झाला आहे.

या योजना मंजुरीच्या प्रतीक्षेत

अकोला जिल्ह्यातील आणखी चार पाणीपुरवठा योजनांचे प्रस्ताव राज्य शासनाच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाकडे पाठविण्यात आले आहे. त्यात मूर्तिजापूर तालुक्यातील लाखपुरी १७ गावे, बार्शीटाकळी तालुक्यातील कान्हेरी सरप १३ गावे, राजंदा १७ गावे आणि बाळापूर तालुक्यातील व्याळा १६ गावे या पाणीपुरवठा योजनांचा समावेश आहे.

या योजनांना मिळाली प्रशासकीय मान्यता

१) बाळापूर तालुका ६९ गावे ः १७९ कोटी

२) तेल्हारा तालुका ६९ गावे ः १४९ कोटी

३) अकोट तालुका ६४ गावे दुरुस्ती ः ६८ कोटी

४) अकोट तालुका ८४ गावे दुरुस्ती ः ४५ कोटी

५) अकोट-तेल्हारा तालुका पोपटखेड ९७ गावे ः १३५ कोटी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com