खड्ड्यातून उसळली गाडी, मग पहा काय झाले?

दीपक पवार
Sunday, 23 August 2020

नागपूर-औरंगाबाद महामार्गाद्वारे जालना येथे जात असतांना चारचाकी वाहन खड्ड्यामधून उसळल्याने गाडी रस्त्याच्या कडेला झाडावर आदळल्याने अपघात झाल्याची घटना ता. २१ ऑगस्ट रोजी दुपारच्या सुमारास घडली. सुदैवाने जीवितहानी टळून चालक किरकोळ जखमी झाले आहे.

कारंजा - लाड (जि.वाशीम) :  नागपूर-औरंगाबाद महामार्गाद्वारे जालना येथे जात असतांना चारचाकी वाहन खड्ड्यामधून उसळल्याने गाडी रस्त्याच्या कडेला झाडावर आदळल्याने अपघात झाल्याची घटना ता. २१ ऑगस्ट रोजी दुपारच्या सुमारास घडली. सुदैवाने जीवितहानी टळून चालक किरकोळ जखमी झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गोंदिया जिल्ह्यातील देवरी येथे महसूल विभागात कार्यरत असणारे कैलास गणेश ढाकणे (वय ३३ वर्ष हे पत्नी किरण कैलास ढाकणे (वय ३२), मुलगी कु. कोमल कैलास ढाकणे (वय १२) हे आपल्या चारचाकी वाहन क्रमांक एम.एच. २१ बी.एफ.७२४४ ने खासगी कामानिमित्त जालना येथे जात असताना नागपूर-औरंगाबाद महामार्गावरील कारंजा तालुक्यातील कोळी फाट्यानजीक रस्त्यावर पडलेल्या जीवघेण्या खड्ड्यातून गाडी उसळल्याने त्यांचे गाडीवरील नियंत्रण सुटले.

अकोला जिल्ह्यातील बातम्यांसाठी क्लिक करा

शिवाय, वाहनाने दोन-तीन पलट्या घेऊन रस्त्यालगतच्या झाडावर जाऊन आदळली. सुदैवाने यात जीवितहानी झाली नाही. मात्र, कैलास ढाकणे यांच्या हाताला जबर दुखापत झाली आहे. सोबतच, वाहनाचे अतोनात नुकसान झाले आहे.

अपघाताची माहिती वाशीम जिल्ह्यातील तत्कालीन महसूल अधिकारी कोरडे यांनी सास प्रमुख श्याम सवाई यांना मिळताच घटनास्थळी धाव घेऊन मंडळ अधिकारी प्रवीण अंधारे, तलाठी विष्णू भोयर, संदीप गुल्हाने यांनी अपघातग्रस्तांना मदत करून त्यांना गावाकडे रवाना केले.

कारंजा तालुक्यातील खड्डे हे वाटसरूंच्या जीवावर उठले असल्याचे या घटनेवरून अधोरेखित होते. तर, संबंधित विभाग या खड्डयांमुळे भीषण अपघाताची होण्याची वाट पाहत आहे का? असा, प्रश्न मार्गक्रमण करीत असणाऱ्या नागरिकांना पडला आहे.
(संपादन - विवेक मेतकर)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Akola Karanja News Accident when a car jumped out of a ditch