Akola : डीजे वाजवणाऱ्या २० मंडळावर गुन्हे दाखल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

DJ

Akola : डीजे वाजवणाऱ्या २० मंडळावर गुन्हे दाखल

अकोट : कावड यात्रेत डीजेला मनाई केलेली असताना देखील शहरात अनेक मंडळांनी डीजेच्या दणदणाटात मिरवणुका काढल्या. त्यानंतर शहर पोलिसांनी ता.२३ ऑगस्ट रोजी रात्री उशिरापर्यंत २० मंडळ व डीजे व्यवसायीकांवर गुन्हे दाखल केले असल्याची माहिती शहर पोलिसांनी दिली.

मिळालेल्या माहितीनुसार, ता. २२ ऑगस्ट रोजी शहरात कावड यात्रेचे आयोजन करण्यात आले होते, यावेळी २६ मंडळांनी मिरवणुकीकरीता आपला सहभाग नोंदविला होता. यावेळी कर्तव्यावर असताना कावड यात्रेत गस्तीवर असलेल्या शहर पोलिसांना काही डीजे चालक-मालक यांनी सर्वोच्च न्यायालयाने घालून दिलेले नियम व अटी लक्षात न घेता कावड यात्रेत सर्रासपणे डीजे लावल्याचे निदर्शनात आले.

डीजेला मनाई केलेली असताना देखील शहरात अनेक मंडळांनी डीजेच्या दणदणाटात कावड यात्रा काढल्या, त्यानंतर अकोट शहर पोलिसांनी ता. २३ ऑगस्ट राजी रात्री उशिरापर्यंत २० कावड मंडळ व डीजे व्यवसायीकांवर गुन्हे दाखल केले आहेत. पुढील तपास अकोट शहर पोलिस करत आहेत.

तारतम्य बाळगा

कावड यात्रेनंतर आता गणपती उत्सव, दुर्गा महोत्सव येणार आहेत. उत्साहाच्या भरात कायदे मोडून संबंधितांवर गुन्हे दाखल झाल्यास, ते निस्तरताना पुढे नोकरी-धंद्यासाठी अडचणीचे ठरू शकते हे युवा कार्यकर्त्यांनी लक्षात ठेवावे. उत्सव हे तेवढ्या पुरते असतात आणि सालाबादप्रमाणे येतात, पण नंतर पदरमोड करून कोर्ट-कचेऱ्या करण्यापेक्षा तारतम्य बाळगणे हिताचे असल्याचे मत अनेक सुजाण नागरिकानी बोलतांना सांगितले.

पोलिसांच्या सूचनांकडे दुर्लक्ष

शहर पोलिसांनी मंडळे व डीजे व्यवसायीकांना डीजे लावू नये, म्हणून नोटीसा दिल्या होत्या. डीजेला परवानगी नाकारल्यामुळे अनेक मंडळांमध्ये नाराजी होती. शहरात सकाळी मिरवणुकीला सुरुवात झाली. काही मंडळांनी पोलिसांच्या सूचनांमुळे डीजे लावले नाहीत, तर बहुतांश मंडळांनी आदेशाकडे दुर्लक्ष करून कावड यात्रेत डीजेला पसंती दिली.

Web Title: Akola Kawad Yatra 20 Group Dj Loudspeaker Sound Noise Pollution Case Filed

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..