

Akola Kawad Yatra Accident
esakal
अकोला: कावड यात्रेसाठी उत्साहाने घराबाहेर पडलेल्या दोन शिवभक्त तरुणांचा प्रवास नियतीने मध्येच थांबविला. खडकीनजीकच्या नवीन आरटीओ कार्यालयाजवळ मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात दुचाकीवरील दोन्ही तरुणांचा जागीच मृत्यू झाला. भरधाव वेगातील दुचाकी रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर आदळल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, कावड यात्रेच्या उत्साहावर शोककळा पसरली आहे.