

Akola district administration has implemented foolproof security arrangements for the 2026 Kanwar Yatra with drone surveillance, CCTV monitoring and a 24x7 control room.
Sakal
अकोला : श्रावण महिन्यातील ऐतिहासिक आणि राज्यभरात प्रसिद्ध असलेल्या कावड उत्सवाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने व्यापक तयारीला सुरुवात केली आहे. कावड यात्रेच्या मार्गावर शिवभक्तांसाठी पथदिवे, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, स्वच्छतागृहे, रुग्णवाहिका, वैद्यकीय पथके तसेच इतर आवश्यक सुविधा उभारण्याचे निर्देश जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी दिले. सर्व विभागांनी समन्वयाने काम करून कावड उत्सव सुरक्षित, शिस्तबद्ध आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पाडावा, असे त्यांनी स्पष्ट केले.