

Major Crackdown in Akola: Khadan Police Seize ₹50 Lakh Cash
Sakal
अकोला : निवडणूक बंदोबस्ताच्या पार्श्वभूमीवर अवैध आर्थिक व्यवहारांवर करडी नजर ठेवणाऱ्या खदान पोलीस स्टेशनच्या पथकाने मोठी कारवाई करत ५० लाखांहून अधिक रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईमुळे शहरात खळबळ उडाली असून, निवडणूक काळातील बेकायदेशीर रोख व्यवहारांवर पोलिसांचे लक्ष असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन पाटील यांनी दिली.