अकोला- खंडवा गेज परिवर्तनाला गती, अकोला रेल्वे स्थानकावर यार्ड रिमॉडेलिंग पूर्ण

सकाळ वृत्तसेेवा
Thursday, 2 July 2020

दक्षिण मध्य रेल्वे ने अकोला ते खंडवा गेज परिवर्तन अंतर्गत अकोला रेल्वे स्थानकावरील रेल्वे हाताळण्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे ठरणारे यार्ड रिमॉडेलिंगचे कार्य पूर्ण केले आहे.

हिवरखेड (जि.अकोला) ः दक्षिण मध्य रेल्वे ने अकोला ते खंडवा गेज परिवर्तन अंतर्गत अकोला रेल्वे स्थानकावरील रेल्वे हाताळण्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे ठरणारे यार्ड रिमॉडेलिंगचे कार्य पूर्ण केले आहे.

सध्या गेज परिवर्तन सुरू असलेले अकोला-खंडवा मीटर गेज सेक्शन मेळघाटच्या अभयारण्याला पार करून थेट मध्यप्रदेश आणि महाराष्ट्राला जोडत होते. 174 किलोमीटरची मीटर गेज लाईन ब्रॉड गेज परिवर्तन करण्याकरिता इ.स. 2008-09 मध्ये 2073 कोटी रुपये अंदाजित खर्चाने मंजूर करण्यात आली.

अकोला जिल्ह्यातील बातम्यांसाठी क्लिक करा

या मार्गासाठी आवश्यक असणारे अकोला रेल्वे स्थानकावरील यार्ड रीमॉडेलिंगचे कार्य पूर्ण करण्यात आले आहे. सध्या असलेल्या तीन लाईन (एक मेन लाईन आणि दोन लूप लाईन) सोबत चौथी लूप लाईन टाकण्यात आली आहे.

सध्या उपलब्ध असलेल्या लूप लाईन ला नवीन लूप लाईन ने जोडण्या करीता तसेच नवीन परिवर्तनाधीन अकोला-अकोट ब्रॉड गेज लाईन ला आपसात जोडण्याकरिता नॉन-इंटर लॉकिंग वर्क चे महत्वपूर्ण कार्य जूनच्या अंतिम टप्यात पूर्ण करण्यात आले.

दक्षिण मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक गजानन माल्या यांनी महत्त्वाच्या कार्यपूर्ती नंतर अशा अपेक्षा व्यक्त केल्या की, हे अकोला यार्ड रिमॉडेलिंगचे कार्य अकोला-अकोट ब्रॉडगेजचे कार्य सुरळीत पूर्ण करता येईल.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Akola-Khandwa gauge conversion speed, yard remodeling completed at Akola railway station