Akola News: दुष्काळी संकटाचे सावट, खरीप पिकांची अवस्था गंभीर; शिवार फेरीकडे शेतकऱ्यांनी फिरवली पाठ

Akola Farmers Skip Farm Tour Amid Kharif Crop Crisis: दुष्काळी संकटात खरीप पिके वाळत असताना शिवार फेरीकडे पाठ फिरवलेल्या शेतकऱ्यांचा प्रश्न; मदत, वीज व पाण्याच्या उपाययोजनांना प्राधान्य देण्याची मागणी
Akola Agriculture News Farmers Demand Relief as Kharif Crops Suffer Amid Drought Like Conditions and Rain Deficit

Akola Agriculture News Farmers Demand Relief as Kharif Crops Suffer Amid Drought Like Conditions and Rain Deficit

esakal

Updated on

-योगेश फरपट

अकोला : पावसाच्या प्रदीर्घ खंडामुळे खरीप पिके संकटात सापडलेली असताना डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात रविवारपासून सुरू झालेल्या तीन दिवसीय खरीप शिवार फेरीकडे पहिल्याच दिवशी शेतकऱ्यांनी पाठ फिरवल्याचे चित्र पाहायला मिळाले. दुष्काळसदृश परिस्थितीमुळे शेतकरी आर्थिक संकटात असताना शिवार फेरीचे आयोजन करण्याची गरज काय, असा सवाल उपस्थित करीत शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com