Akola : कुरूम परिसरातील पाच गावात १७ गुरांना लम्पीची लागण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Akola Kurum village 17 cattle infected with lumpy skin disease

Akola : कुरूम परिसरातील पाच गावात १७ गुरांना लम्पीची लागण

कुरूम : सद्या राज्यभरात लम्पी स्कीन आजाराने थैमान घातले असून, यात मोठ्या प्रमाणात पशुधन मृत्युमुखी पडत असल्याच्या घटना घडत आहेत. अशातच मूर्तिजापूर तालुक्यातील कुरूम परिसरातील पाच गावात १७ गुरांना लम्पी स्कीन आजाराची लागण झाली असून, तीन हजाराहून अधिक जनावरांचे लम्पी प्रतिबंधित लसीकरण झाले आहे. परंतु, या आजारामुळे परिसरातील पशुपालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

पशुवैद्यकीय दवाखाना कार्यक्षेत्रात कुरूमसह मधापुरी, कवठा सोपिनाथ, जामठी (खु.), वडगाव, हयातपूर, रामटेक, मंदुरा, पोता, खोळद, जेठापूर, सुलतानपूर, पिवशी, नवसाळ व माटोडा, अशी एकूण १५ गावे येतात. यातील खोडद सात, कुरूम चार, पोता एक, वडगाव दोन, कवठा सोपीनाथ तीन अशा पाच गावातील एकूण १७ गुरांना लम्पीची बाधा झाली आहे, त्यामुळे पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी-१ मार्फत कुरूमसह परिसरात आजपर्यंत तीन हजाराहून अधिक जनावरांना लम्पी चर्मरोग प्रतिबंधक लस टोचण्यात आली.

सद्या गुरांच्या आरोग्याची स्थिती चांगली असून, १७ बाधित पैकी सात गुरे बरी झाली असून, सद्यास्थितीत दहा गुरांवर उपचार सुरू असल्याची माहिती पशुवैद्यकीय दवाखानाचे पशुधन विकास अधिकारी डॉ.व्हि.एन. सानप यांनी दिली. अत्यल्प कमी संसाधने व मनुष्यबळ उपलब्ध नसतांनाही पशुवैद्यकिय दवाखान्याने केलेल्या कार्याचे कौतुक होत आहे. पशुधन विकास अधिकारी डॉ.सानप, आर.डी. ढगे यांना स्थानिक पदविकाधारक अतुल रेवस्कर, मंगेश विरुळकर, प्रज्वल बाजड, यश शिरभाते, सुमित शिरभाते, प्रज्वल बेलसरे, प्रशांत उके, शुभम बाढे, वैभव मानकर, प्रवीण अडसोड यांचे सहकार्य केले.

ग्रामपंचायतच्या वतीने फवारणी

जनावरांवर लम्पी चर्मरोग आजाराचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कुरूम ग्रामपंचायतच्या वतीने ता. १७ व १८ सप्टेंबर रोजी गावातील प्रत्येक जनावरांच्या गोठ्यात तातडीने सोडियम हायड्रोक्लोराईड या औषधाची फवारणी करण्यात आली.