Akola: उशिरा येणाऱ्या कर्मचाऱ्यांचे कापणार वेतन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बाळापूर पंचायत समिती
उशिरा येणाऱ्या कर्मचाऱ्यांचे कापणार वेतन

अकोला : उशिरा येणाऱ्या कर्मचाऱ्यांचे कापणार वेतन

बाळापूर : पंचायत समिती कार्यालयात उशिरा येणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचे आता थेट वेतन कपात केले जाणार आहे. या संदर्भात बाळापूर पंचायत समितीचे उपसभापती धनंजय दांदळे यांनी नुकताच आदेश काढला आहे. विशेष म्हणजे ‘सकाळ’मध्ये प्रकाशित झालेल्या बातमीची दखल घेत उपसभापतींनी कार्यालयात उशिरा येणाऱ्या कर्मचाऱ्यांची कानउघाडणी केली आहे. पंचायत समितीचे गटविकास अधिकारी व कर्मचाऱ्यांचा कारभार रामभरोसे चालू आहे.

दिवाळीची सुट्टी उपभोगूनही हे अधिकारी आणि कर्मचारी आपल्या दालनात दिसत नाहीत, अशा आशयाचे वृत्त काल बुधवारी "सकाळने" प्रकाशित केले होते. या वृत्ताची तात्काळ दखल घेत उपसभापती धनंजय दांदळे यांनी पंचायत समितीच्या सभागृहात अधीकारी व कर्मचारी यांची तातडीची बैठक बोलावली. या बैठकीत त्यांनी कार्यालयात उशिरा येणाऱ्या व दांडी मारणाऱ्या अधीकारी व कर्मचारी यांचा चांगलाच खरपूस समाचार घेतला. यावेळी बाळापूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी ओ. टी. गाठेकर यांनी अकोला येथे जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीला गेले असल्याचे स्पष्ट केले.

हेही वाचा: T20 WC : पाकिस्तानचा खेळ खल्लास! नवा गडी नवं राज्य!

मात्र इतर कर्मचारी व विस्तार अधिकारी हे कार्यालय उपस्थित न राहूनही दालनातील लाईट व पंखे का सुरू असतात, याचा जाब उपसभापतींनी कर्मचाऱ्यांना विचारला. तीन तास चाललेल्या या बैठकीत उपसभापतींनी कर्मचारी वर्गाला चांगलेच धारेवर धरत त्यांनी कार्यालयात उशीरा येणाऱ्या कर्मचाऱ्यांचे वेतन कपात करण्यात येणार असल्याचे स्पष्ट आदेश यावेळी देण्यात आले आहेत.

रोहयोच्या कामांची होणार चौकशी बाळापूर तालुक्यात रोहयोच्या कामात अनेक गावांमध्ये गैरव्यवहार होत असल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहेत. त्यामुळे रोहयोचे कर्मचारी व रोजगार सेवकांची एक बैठक बोलावून आतापर्यंत झालेल्या कामांची चौकशी करण्यात येणार असल्याचे उपसभापती दांदळे यांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले.

हेही वाचा: एक कॅच सुटला अन् पाकिस्तानचं झालं T20 वर्ल्ड कपमधून 'पॅक-अप'

‘सकाळ’मधे प्रकाशित झालेल्या वृत्ताची आम्ही दखल घेतली असून यासंदर्भात पंचायत समितीच्या कर्मचाऱ्यांना समज दिला आहे. यापुढे कर्तव्यात कसूर करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची गय केली जाणार नाही. - रुपाली एम. गवई सभापती, पंचायत समिती बाळापूर

कमात दिरंगाई करणाऱ्या अधिकारी व कर्मचारी यांची तातडीची बैठक घेण्यात आली असून कार्यालयात उशिरा पोहोचणाऱ्या व दुपार नंतर दांडी मारणाऱ्या कर्मचाऱ्यांचे वेतन कापले जाणार आहे. असे आदेश या बैठकीत दिले आहेत. -धनंजय दांदळे, उपसभापती, बाळापूर

loading image
go to top