
अकाेला : फलक लावल्यावरून दोन गटात वाद
बार्शीटाकळी : स्व.वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्ताने शुभेच्छा देणारे फलक गावातील एका समाजाच्या वतीने लावण्यात आले. हे फलक याठिकाणी का लावले? यावरून दोन गटात बाचाबाची झाली. याचे रुपांतर वादत झाल्याची घटना तालुक्यातील अजनी (बु.) येथे ता. २ जुलै रोजी रात्रीच्या सुमारास घडली. घटनास्थळी राज्य राखीव दलाच्या तुकडीला पाचारण करण्यात आले.
मिळालेल्या माहितीवरून, बार्शीटाकळी तालुक्यातील अजनी (बु.) येथे स्व.वसंतराव नाईक यांच्या जयंतीच्या शुभेच्छा देणारे फलक गावातील एका समाजाच्या वतीने लावण्यात आले. हे फलक येथे का लावले?, अशी विचारणा गावातील दुसऱ्या समाजातिल ग्रामस्थांकडून करण्यात आली. फलक चुकीच्या जागी लावण्यात आल्याचे त्यांचे म्हणणे होते. या ठिकाणी फलक लावण्याच्या घटनेला आपल्या अस्मितेचा मुद्दा बनविल्याणे विषय गंभीर होत गेला.
दुसऱ्या समाजातील एका व्यक्तीने तो फलक काढून रस्त्यावर टाकून दिला. ही वार्ता गावात वाऱ्यासारखी पसरली, त्यामुळे दोन्ही गटात वाद होण्याची शक्यता निर्माण होत नाही तोच फलक लावणाऱ्या गटातील एका व्यक्तीने लावलेल्या फलकाच्याच बाजूला लागून असलेले छत्रपती शिवाजी महाराजांचे तैलचित्राचे फलक काढून टाकला, त्यामुळे वाद चांगलाच पेटलला. घटनेची माहिती बार्शीटाकळी पोलिसांनी मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन दोन्ही गटाला शांतता राखण्याचे आवाहन केले. परंतु, कुणीही ऐकायला तयार नसल्याचे पाहून पोलिसांनी दोन्ही गटातील सहभागी असणाऱ्यांना अटक करून पोलिस स्टेशनला आणून त्यांच्यावर गुन्हे दाखल केले.
आता गावात शांतता असून, परिस्थिती नियंत्रणा बाहेर जाऊ नये यासाठी गावात राज्य राखीव दलाचे जवान तैनात करण्यात आले आहेत. याविषयी पोलिस निरीक्षक संजय सोळंके यांच्याशी चर्चा केली असता, त्यांनी सांगितले की, दोन्ही गटातील लोकांना समजावून सांगून हा वाद आपसी निकालात काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत व या प्रयत्नाला नक्कीच यश मिळेल अशी खात्री त्यांनी व्यक्त केली.
Web Title: Akola Late Vasantrao Naik Birth Anniversary Banner Dispute Between Two Group
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..