पानाच्या वेली बहरल्या, व्यवसायाचे काय?, लॉकडाउनमुळे व्यवसायाला अवकळा; पान उत्पादक शेतकऱ्यांना फटका

विवेक मेतकर
मंगळवार, 14 जुलै 2020

"खाईके पान बनारसवाला...' हे गाणं आपण नेहमीच गुणगुणत असतो. मात्र, लॉकडाउनमुळे या पानावर बंदी आली आहे. कोरोना व्हायरसचा धोका लक्षात घेता सरकारने सर्व जीवनावश्‍यक वस्तूंची दुकान वगळता सर्व दुकान बंद केली होती. आता इतर व्यवसाय हळूहळू सुरू होत असले तरी पानटपऱ्या व पान व्यावसायिकांची दुकाने बंदच आहेत. त्यामुळे पान वेलींना बहर आला असला तरी व्यवसाय अडचणीत असल्याने त्याचा फटका पान उत्पादक शेतकऱ्यांनाही बसला आहे.

अकोला  ः "खाईके पान बनारसवाला...' हे गाणं आपण नेहमीच गुणगुणत असतो. मात्र, लॉकडाउनमुळे या पानावर बंदी आली आहे. कोरोना व्हायरसचा धोका लक्षात घेता सरकारने सर्व जीवनावश्‍यक वस्तूंची दुकान वगळता सर्व दुकान बंद केली होती. आता इतर व्यवसाय हळूहळू सुरू होत असले तरी पानटपऱ्या व पान व्यावसायिकांची दुकाने बंदच आहेत. त्यामुळे पान वेलींना बहर आला असला तरी व्यवसाय अडचणीत असल्याने त्याचा फटका पान उत्पादक शेतकऱ्यांनाही बसला आहे.

खरं तर पान वेली उत्पादक शेतकऱ्यांसाठी व्यवसायाचा काळ. उन्हाळ्याच्या तोंडावर पान वेलीचं भरघोस उत्पन्न होत असतं. मात्र, यंदा कोरोना संसर्गामुळे देशात लॉकडाउन जाहीर करण्यात आले आहे. मात्र, पान वेलीच्या उत्पादक शेतकऱ्यांना याचा मोठा आर्थिक फटका बसला आहे.

अकोला जिल्ह्यातील बातम्यांसाठी क्लिक करा

राज्यातील सर्व हॉटेल, लग्न समारंभ, पानटपरीचे दुकान, पान मसाला दुकान ही सध्या बंद आहेत. विशेष म्हणजे या काळात पानाला मोठ्या प्रमाणात मागणी असते. मात्र, लॉकडाउनच्या काळात या पान वेलींची मागणी घटली आहे. त्यामुळं पान वेली उत्पादक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे. या लॉकडाउनची फार मोठी आर्थिक झळ पान वेल उत्पादक शेतकऱ्यांना सोसावी लागत आहे. अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्‍यातील दानापूर या गावात शेकडो पान वेलींचे मळे आहेत. त्यात पानं तोडण्यासाठी असंख्य मजुरांना बाराही महिने काम मिळत असते.

सीबीएसई बारावी परीक्षेत अकोल्यातील विद्यार्थी चमकले 

विशेषतः उन्हाळ्यात लग्न सराईमुळे पान शौकिनांची संख्या अधिकची असते. त्यातून शेतकऱ्यांना चांगला आर्थिक फायदा होत असतो. मात्र, यंदा लॉकडाउनमुळे पानवेली जाग्यावरच पडून आहेत. त्यातून शेतकऱ्यांना लाखो रुपयांचा फटका बसत असल्याचं शेतकऱ्याने "सकाळ'शी बोलताना सांगितले.
 
शेतकरी व शेतमजूर कुटुंबही अडचणीत
आमची पारंपरिक शेती आहे. दोन एकर पान मळ्याच्या शेतीमध्ये जवळ-जवळ दीड हजार कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो. मार्च-एप्रिल हा उत्पन्नाचा महिना आहे आणि त्यातच उत्पन्नाच्या या महिन्यांमध्ये लॉकडाउन झालं. त्यामुळे शेतकरी व शेतमजूर कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे. दरवर्षी खर्च वजा जाता दोन एकरातून एक लाख रुपयाचे उत्पन्न होते. लॉकडाउनमुळे मळ्यातला मळ्यातच राहिला. बाजारात जाण्याचा काही प्रश्नच नाही.

Video: अरे हे काय? पेट्रोल दिलं नाही म्हणून चक्क ऑफिसमध्येच सोडले कोब्रा नाग 

अकोला जिल्ह्यातील अकोट, तेल्हारा या तालुक्‍यात पानमळे आहे. आता काही बोटावर मोजण्या इतक्‍या शेतकऱ्यांचे पानमळे शिल्लक आहे. रोगराई आणि लागवडीचा खर्च वाढल्याने पानमळे परवडेनासे झाले आहे. त्यातच लॉकडाउनमुळे पानाला मागणीच नाही. गुटखा-खर्यामुळे पारंपरीक ग्राहकही दुरावल्याचा परिणाम पान व्यवसायावर झाला आहे.
- मंगेश हागे, पान उत्पादक शेतकरी दानापूर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: akola Leaf vines blossomed, what about business ?, lockdown disrupts business; A blow to home growers