esakal | कोरोना निर्बंधांचा भंग करणाऱ्या ४० ऑटोचालकांवर गुन्हे दाखल
sakal

बोलून बातमी शोधा

कोरोना निर्बंधांचा भंग करणाऱ्या ४० ऑटोचालकांवर गुन्हे दाखल

कोरोना निर्बंधांचा भंग करणाऱ्या ४० ऑटोचालकांवर गुन्हे दाखल

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अकोला ः कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव (Corona Virus) लक्षात घेता मागील एक महिन्यापासून अकोला जिल्ह्यात लॉकडाउन (Lockdown in akola) घोषित करण्यात आला आहे. त्याच प्रमाणे संचारबंदी सुद्धा आहे. काही निर्बंध लादण्यात आले आहे. त्याअंतर्गत ऑटोरिक्षामध्ये चालकाशिवाय दोन प्रवाश्यांना परवानगी देण्यात आली होती; परंतु शहरातील काही ऑटो चालक दिलेल्या निर्देशाचा भंग करून दोन पेक्षा जास्त प्रवाश्यांची वाहतूक करीत असल्याचे निदर्शनास आले. (Akola Lockdown News 40 auto drivers charged)

पोलिस अधीक्षक जी. श्रीधर यांचे निर्देशाप्रमाणे शहर वाहतूक शाखेचे पोलिस निरीक्षक गजानन शेळके यांनी सोमवारी विशेष मोहीम राबवून कोरोना निर्देशाचा भंग करून दोन पेक्षा जास्त प्रवासी वाहून नेणाऱ्या ऑटोवर कारवाई करून जवळपास ४० ऑटो शहर वाहतूक शाखेत लावून चालकांवर गुन्हे दाखल केले.

हेही वाचा: आजपासून ऑनलाईन भरणार 'अकोल्याची जत्रा'

संचारबंदीचा भंग करून विनाकारण फिरणाऱ्या जवळपास २० मोटारसायकल चालकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. इतर ३५० वाहन चालकांविरुद्ध दंडात्मक कारवाई करून जवळपास २० हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. ही कारवाई पोलिस अधीक्षक जी. श्रीधर यांचे निर्देशा प्रमाणे, अप्पर पोलिस अधीक्षक मोनिका राऊत, उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन कदम यांचे मार्गदर्शनाखाली शहर वाहतूक शाखेचे पोलिस निरीक्षक गजानन शेळके व त्यांचे सहकाऱ्यांनी केली.

Akola Lockdown News 40 auto drivers charged