या दोन तालुक्‍यात दोन दिवस लॉकडाउन कायम!, औषध दुकानांसह वैद्यकीय सेवा राहतील सुरू

सुगत खाडे  
Tuesday, 21 July 2020

कोरोना विषाणूचा अकोट तालुक्‍यात वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता उपविभागीय अधिकारी गजानन सुरंजे यांनी टाळेबंदीत (लॉकडाउन) बुधवार (ता. 22) पर्यंत वाढ केली आहे. त्यामुळे अकोट उपविभागातील अकोट शहर व तालुक्‍यासह तेल्हारा तालुक्‍यात टाळेबंदी कायम राहिल. टाळेबंदीच्या काळात वैद्यकीय सेवांसह औषध दुकाने मात्र सुरू राहतील.

अकोला  ः कोरोना विषाणूचा अकोट तालुक्‍यात वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता उपविभागीय अधिकारी गजानन सुरंजे यांनी टाळेबंदीत (लॉकडाउन) बुधवार (ता. 22) पर्यंत वाढ केली आहे. त्यामुळे अकोट उपविभागातील अकोट शहर व तालुक्‍यासह तेल्हारा तालुक्‍यात टाळेबंदी कायम राहिल. टाळेबंदीच्या काळात वैद्यकीय सेवांसह औषध दुकाने मात्र सुरू राहतील.

जिल्ह्यात कोविड-19 चा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी 18 ते 20 जुलै दरम्यान तीन दिवस संपूर्ण टाळेबंदी लागू करण्यात आली. सदर तिन्ही दिवस नागरिकांनी टाळेबंदीचे पालन केले. परंतु अकोट तालुक्‍यात मात्र कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे कोविड-19 चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अकोटचे उपविभागीय अधिकारी गजानन सुरंजे यांनी अकोट व तेल्हारा तालुक्‍यातील टाळेबंदी बुधवार (ता. 22)पर्यंत वाढवली आहे. टाळेबंदी लागू असलेल्या तालुक्‍यांमध्ये मुक्‍त संचार करण्यास मनाई राहिल. परंतु वैद्यकीय सुविधा मात्र सुरूच राहतील.

Video : विधवा महिलेची करून कहानी, बैलाऐवजी मुलालाच जुंपले डवरणीला

दरम्यान, अकोट  तालुक्यात कोरोना व्हायरसने मोठा कहर केला आहे. आज विक्रमी  कोरोनाचे ३३ नवीन रुग्ण आज आढळून आल्याने तालुक्यात चिंतेचे वातावरण आहे.  कोरोनाग्रस्तांची एकूण संख्या १६४ वर पोहचली आहे. यापैकी २९ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून आतापर्यंत ८ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. सद्यस्थितीला १२७ रुग्णांवर उपचार सुरू असल्याचे प्रशासनाने कळवले आहे.

अकोला जिल्ह्यातील बातम्यांसाठी क्लिक करा

आज १९ जुलै रोजी सायंकाळी ६ वाजेपर्यंत आलेल्या अहवालात पालिका हद्दीत १७ तर ग्रामीण भागात १६ रुग्णांची वाढ झाली आहे,(१८जुलै रात्री ९ वाजता पासून तर १९ जुलै सकाळ पर्यंत) अकोट शहरात आढळून आलेल्या रूग्णांपैकी २८ रुग्ण हे शासकीय आदिवासी आश्रमशाळा पाटसुल येथील अलगिकरण मधले असून ,३ रुग्ण शहरातील श्रीहरी फूड  पार्क  या अलगिकरण केंद्रातील आहे, त्यामुळे एकूण ३१ बाधित हे अलगिकरण मधले आहेत तर , २ रुग्ण हे नव्याने बाधित झाले आहे,

(संपादन -  विवेक मेतकर)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: akola Lockdown will continue for two days in akot and telhara taluka, Medical services will continue along with drug stores