Amit Shaha : बटन अकोल्यात दाबा, करंट इटलीत लागला पाहिजे!

अकोल्यातील सभेत अमित शहांचा काँग्रेसवर हल्लाबोल
Amit Shaha
Amit Shahasakal

अकोला - केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी काँग्रेसवर अकोल्यातील सभेत जोरदार हल्लाबोल केला. या सभेत त्यांनी काँग्रेसच्या दहा वर्षांच्या सत्ता काळात महाराष्ट्राला काय मिळाले, असा प्रश्न उपस्थित केला. तर भाजपच्या दहा वर्षांच्या काळात महाराष्ट्राला किती मदत मिळाली. याची आकडेवारी जाहीर केली.

अमित शाह यांनी सर्व औपचारिकता सोडून थेट भाषणाला सुरुवात केली. बटन अकोल्यात असे दाबा की करंट इटलीत लागला पाहिजे, असे म्हणत त्यांनी भाजप उमेदवाराला विजयी करण्याचे आवाहन केले.

मंगळवारी अकोल्यात महायुतीचे उमेदवार अनुप धोत्रे यांच्या प्रचारार्थ जाहिर सभा आयोजित केली होती. या सभेला प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, खासदार भावना गवळी, आमदार रणधीर सावरकर, आमदार डॉ. संजय कुटे, ॲड. आकाश फुंडकर, माजी आमदार चैनसुख संचेती, आमदार अमोल मिटकरी यांच्यासह महायुतीचे जिल्हयातील सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

शहांनी उद्धव ठाकरे हे पुत्र मोहात अडकल्याचे सांगत त्यांच्यावर कुठलेही भाष्य केले नाही. तर थेट शरद पवार यांच्यावर टीका करत सोनिया गांधी आणि मनमोहन सिंग यांच्या सरकारमध्ये महाराष्ट्राला काय मिळाले, याचे उत्तर मागितले. तर त्याचे उत्तर आपण सोबत आणल्याचा दावा शाह यांनी सभेत केला. दहा वर्षांत काँग्रेस सरकारने महाराष्ट्राला १ लाख ९१ हजार कोटी दिले. भाजपाने ७ लाख १५ हजार कोटी रुपये महाराष्ट्राला दिले.

२ लाख ९० हजार कोटी रुपये पायाभूत सुविधांसाठी, ७५ हजार कोटी रुपये रस्त्यांच्या निर्माणासाठी तर दोन लाख कोटी रुपये रेल्वेसाठी आणि चार हजार कोटी २ विमानतळ विस्तारासाठी दिल्याचा दावा अमित शाह यांनी केला. भारतात भाजप नेते व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात गुंतवणुकीत महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आल्याचा दावा अमित शाह यांनी केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com