esakal | Lonar: अतिवृष्टीने वनविभागाचे सहा माती तलाव फुटले
sakal

बोलून बातमी शोधा

लोणार : कृषी विभागाचा पाझर तलाव फुटला

लोणार : अतिवृष्टीने वनविभागाचे सहा माती तलाव फुटले

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

लोणार (जि. बुलडाणा) : तालुक्यातील अतिदुर्गम भागात धाड येथील वनविभागाचे ६ निकृष्ट माती तलाव वाहून गेल्याने त्या तलाव खाली येणाऱ्या शेकडो शेतकऱ्यांची हजारो हेक्टर शेत जमीन व पिके खरडून गेली.

तालुक्यात १ ऑक्टोबरला झालेल्या अतिवृष्टीमुळे धाड येथील वनविभागाने बनवलेले ६ माती तलाव फुटून या तलावाखाली येणाऱ्या शेकडो शेतकरी बांधवाची शेत जमीन तसेच मोटर पंप, स्पिंकलर सेट, सौरउर्जाचे पंप सेट, ठिबक संच तसेच पिके पूर्णतः वाहून गेली असून, काही ठिकाणी जमीन खरडून गेली. काही शेतकऱ्यांचे पाळीव प्राणी गाई, म्हैशी, बेल तसेच दुचाकी वाहने सुद्धा वाहून गेली. माती बांधाचे काम अतिशय निकृष्ट केल्याने सदर परिस्थिती ओढावली असल्याचा आरोप होत आहे. कामात लाखो रुपयांचा भ्रष्टाचार केल्याने व आधी सुध्दा तलाव फुटला होता. त्याची दुरुस्ती सुद्धा थातूरमातूर केल्याने परत तलाव फुटल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.

हेही वाचा: मुलानं सेक्स करावा, ड्रग्जही घ्यावं; शाहरुखने 24 वर्षांपूर्वी केलेलं वक्तव्य

थातूरमातूर काम करून लाखो रुपयांचा भ्रष्टाचार करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कार्यवाही व्हावी अशी मागणी धाड ग्रामस्थांनी केली आहे. यावेळी शिवछत्र मित्र मंडळाचे अध्यक्ष नंदकिशोर मापारी, शिवसेना शहर प्रमुख पांडुरंग सरकटे, सरपंच भगवानराव कोकाटे यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी केली. यावेळी शेतकरी विश्वमबर सांगळे, राजेश ताठे, बंडू सांगळे, मंथन ढाकणे, पोलीस पाटील शिवाजी सांगळे, अनोज पारस जाजडा, परमेश्वर शेजुळ यांची उपस्थिती होती.

वनविभागाच्या निकृष्ट माती तलावामुळे मी एक लाख पाच हजार रुपये खर्चून माती भिंत तयार केली होती. परंतु, एक सोबत सर्व तलाव फुटल्याने माझ्या शेताच्या रक्षणासाठी बनवलेली भिंत व शेतातील पीक, जमीन खरडून गेली आहे. वारंवार वनविभागाकडे यासंबंधी तक्रार केली होती. परंतु, त्यांनी तक्रारीला प्रतिसाद दिला नाही.

- विश्‍वंभर सांगळे, शेतकरी, धाड

वारंवार माती तलावाच्या निकृष्ट कामाच्या तक्रारी करूनही तक्रारीला केराची टोपली दाखून भ्रष्टाचार करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना पाठीशी घातले. त्यामुळेच परिस्थिती शेतकरी बांधवावर ओढवली. त्यामुळे दोषी अधिकारी व कर्मचारी यांच्यावर कार्यवाही करावी अन्यथा शेतकरी आक्रमक झाल्यास दुष्परिणांची जबादारी प्रशासनाची राहील.

- बंडू सांगळे, शेतकरी, धाड

loading image
go to top