esakal | 'माझ्या मुलानं सेक्स करावा, ड्रग्ज घ्यावेत', आर्यन पाळण्यात असतानाच शाहरुखने केलं होतं वक्तव्य
sakal

बोलून बातमी शोधा

शाहरुखने 24 वर्षांपूर्वी केलेलं वक्तव्य

मुलानं सेक्स करावा, ड्रग्जही घ्यावं; शाहरुखने 24 वर्षांपूर्वी केलेलं वक्तव्य

sakal_logo
By
दत्ता लवांडे

मुंबई - एनसीबीने शनिवारी रात्री मोठी कारवाई करत क्रूझवर सुरु असलेल्या रेव्ह पार्टीवर छापा टाकला. या प्रकरणी आतापर्यंत १३ जणांना ताब्यात घेण्यात आलं आहे. यामध्ये बॉलिवूडच्या मोठ्या स्टारचा मुलगासुद्धा असल्याचं समोर येतं. अद्याप याबाबत एनसीबीने अधिकृत माहिती दिलेली नाही. मात्र इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तानुसार, एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांनी शाहरुख खानच्या मुलाची चौकशी सुरु असल्याचं म्हटलं पण त्याच्यावर गुन्हा दाखल नसल्याचं सांगितलं आहे. दुसरीकडे सोशल मीडियावर एनसीबीच्या कारवाईवेळचा व्हिडिओ आणि शाहरुख खानचा मुलगा आर्यनचा त्याच कपड्यांमध्ये असलेला फोटो शेअर करून त्यालाच अटक करण्यात आलाच्या दावा नेटकऱ्यांकडून करण्यात येतोय.

आता एनसीबीची ड्रग्ज प्रकरणी कारवाई आणि शाहरुख खानच्या मुलाच्या नावाची चर्चा सुरु असताना याआधी किंग खानने केलेल्या एका वक्तव्याची पुन्हा एकदा चर्चा होत आहे. मुलगा आर्यन खानबद्दल एक चकित करणारं वक्तव्य केलं होतं. तो म्हणाला होता की माझ्या मुलाने सेक्स करावं आणि ड्रग्स घ्यावीत. शाहरूख खान एका मुलाखतीत मुलगा आर्यन बद्दल असा बोलला होता. त्यामुळे सगळ्यांचे लक्ष वेधले गेले होते. मी माझ्या जवानीत जे काम करू शकलो नाही ते माझ्या मुलाने करावे असं तो म्हणाला होता.

हेही वाचा: पाचोड : चार शेळ्या, ५० कोंबड्यांचा मृत्यू; मराठवाड्यात पावसाचा कहर सुरूच

शाहरूख खान १९९७ मध्ये आपल्या पत्नीसोबत सिमी ग्रेवाल च्या टॉक शो ला गेला होता. तेव्हा नुकताच त्याच्या पहिल्या मुलाचा जन्म झाला होता. त्यावेळी त्यांच्या मुलाबाबत विचारणा केली होती. सिमीने शाहरूखला त्याच्या त्याच्या मुलाच्या भविष्याबाबत विचारल्यानंतर त्याने माझ्या मुलाने मला माझ्या जवानीत परिस्थितीमुळे आणि सुविधा नसल्याने जे करता आले नाही ते ते करावे,असे तो म्हणाला होता.

शाहरुख सिमी ग्रेवाल ला म्हणाला होता की ''माझा मुलगा जेव्हा ३-४ वर्षाचा होईल तेव्हा मी त्याला सांगेन की तो बिनधास्त मुलींमागे जाऊ शकतो, ड्रग्स घेऊ शकतो, सेक्स करू शकतो. त्याने हे कमी वयातच सुरू करायला पाहिजे. मला वाटतं की आर्यन बाहेर गेल्यावर मुलींनी त्याची तक्रार माझ्याकडे केली पाहिजे.'' असं शाहरूख खान म्हणाला होता. सध्या आर्यन चे फोटोला सोशल मिडियावर खूप पसंती मिळत आहे. त्याची पदवी पूर्ण झाली असून लोकं त्याच्या बॉलिवुड मधील पदार्पणाच्या प्रतिक्षेत आहेत.

loading image
go to top