Akola : जिल्ह्यात २६ गावांमध्ये ‘लम्पी’ रोगाचा फैलाव | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Akola Lumpy Skin Disease

Akola : जिल्ह्यात २६ गावांमध्ये ‘लम्पी’ रोगाचा फैलाव

अकोला : जिल्ह्यात २६ गावांमध्ये ‘लम्पी’ त्वचा रोगाचा फैलाव झाला असून, आतापर्यंत ३८३ जनावरांना आजाराची लागण झाली आहे. त्यामुळे जनावरांमधील या आजाराचा फैलाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपायांवर भर द्यावा, असे निर्देश जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी सर्व पशुवैद्यकीय अधिकारी व अधिकाऱ्यांना दिले.

‘लम्पी त्वचा रोग-प्रतिबंध व उपाययोजना’ या बाबत सर्व पशुवैद्यकीय अधिकारी तसेच महसूल व ग्रामविकास अधिकाऱ्यांची आढावा बैठक गुरुवारी (ता.१) घेण्यात आली. या बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटीयार, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. जगदीश बुकतरे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ.जी.एम. दळवी, सहा.आयुक्त पशुसंवर्धन डॉ. तुषार बावने, डॉ. बाळकृष्ण धुळे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, सर्व सहा.आयुक्त पशुसंवर्धन, पशुधन विकास अधिकारी, सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी आदी उपस्थित होते.

जिल्ह्यात २६ गावांमधील ३८३ जनावरांमध्ये या आजाराची लागण झाली असून, उपचारानंतर २९४ जनावरे बरी झाली आहेत. प्रादूर्भाव झालेल्या ठिकाणांच्या ५ किमी त्रिज्या परिसरात ९२ गावे असून, या गावांमध्ये गायवर्गीय २५ हजार ९८१ तर म्हैसवर्गीय ४९९९ असे एकूण ३० हजार ९८० जनावरांची संख्या आहे. या सर्व जनावरांचे लसीकरणाचे काम हाती घेण्यात आले असून, आतापावेतो १७ हजार ५९६ जनावरांचे लसीकरण पूर्ण झाल्याची माहिती यावेळी डॉ. बुकतरे यांनी दिली.

Web Title: Akola Lumpy Disease Spread 26 Villages 383 Infected Animal

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :AkolaanimalDiseasehealth