

ramesh alkari akola
esakal
भारतीय जनता पक्षाच्या एका जुन्या आणि समर्पित कार्यकर्त्याला पक्षाने उमेदवारी नाकारल्याने राजकीय वातावरणात मोठी चर्चा सुरू झाली आहे. गेल्या साडेचार दशकांपासून पक्षाशी जोडलेले रमेश जनार्दन अलकरी यांनी याच्या निषेधार्थ पक्षातील सर्व पदांचा त्याग करून अपक्ष म्हणून निवडणूक लढवत आहेत. त्यामुळे अकोला महापालिका निवडणुकीत भाजपला स्वतःच्या मतदारसंघातच आव्हानाचा सामना करावा लागत आहे.