
मंगरुळपीर रोडवर असलेल्या लघु सिंचन पाटबंधारे विभागाची कार्यालये, निवासस्थान अतिशय जीर्ण झाली आहेत. केव्हाही कोसळू शकतील अशी परिस्थिती असल्याने कर्मचारी जीव मुठीत धरून राहत आहेत.
मानोरा (जि.वाशीम) : मंगरुळपीर रोडवर असलेल्या लघु सिंचन पाटबंधारे विभागाची कार्यालये, निवासस्थान अतिशय जीर्ण झाली आहेत. केव्हाही कोसळू शकतील अशी परिस्थिती असल्याने कर्मचारी जीव मुठीत धरून राहत आहेत.
लघु सिचन पाटबंधारे विभागाच्या कर्मचाऱ्यांसाठी नऊ निवासस्थाने बांधले आहेत. ही निवासस्थाने जीर्ण झाल्याने अतिशय धोकादायक स्थितीत असल्यामुळे केव्हाही कोसळू शकतात. निवासस्थाने व कार्यलायाचा पाया ठिकठिकाणी उखडला आहे. दरवाजे, खिडक्या, काच तुडल्या आहेत.
अकोला जिल्ह्यातील बातम्यांसाठी क्लिक करा
छतामध्ये अनेक ठिकाणी पाणी गळत आहे. हीच अवस्था कार्यलायची आहे. पाया मोडकळीस आल्यामुळे इमारत केव्हाही जमीनदोस्त होण्याची दाट शक्यता आहे. ही निवासस्थाने, कार्यलाये अंदाजे ४० वर्षांपूर्वी बाधण्यात आली आहेत.
इमारतीच्या नवीन बांधकामाकरिता तत्कालीन शाखा अभियंता यांनी शासनाकडे प्रस्ताव सादर केला होता. परंतु, हा प्रस्ताव धुळ खात पडला आहे.
लघु पाटबंधारे विभागाच्या एकूण नऊ निवासस्थानांपैकी सहा ओस पडली आहेत. त्यामध्ये तीन निवासस्थानामध्ये तीन कर्मचारी परिवारासह राहतात. अशा परिस्थितीत कर्मचारी काय काम करणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे. अनेक वर्षांपासून या निवासस्थानची दुरुस्ती सुध्दा करण्यात आली नाही. बाजूला उपविभागीय कार्यालय असून, त्याही कार्यलायची परिस्थिती अशीच आहे. या निवासस्थानाचा प्रश्न मार्गी लावावा, अशी मागणी होत आहे.
सिंचन विभागाचे निवासस्थाने, कार्यालय जीर्ण झाली आहेत. नवीन इमारतीकरिता प्रस्ताव शासनाकडे सादर केला आहे. परंतु, मंजुरी मिळाली नाही.
- रवी मेश्राम, शाखा अभियंता, लघु सिंचन पाटबंधारे विभाग, मानोरा
(संपादन - विवेक मेतकर)