esakal | पतंग उडविण्यासाठी शेतात गेलेल्या दहा वर्षांच्या मुलाचा शेततळ्यात बुडून मृत्यू
sakal

बोलून बातमी शोधा

Akola Marathi News A 10-year-old boy who went to the field to fly a kite drowned in the field

शहरातील अल्लाडा प्लॉट परिसरातील शेतशिवारात असलेल्या शेततळ्यामध्ये बुडाल्याने १० वर्षांच्या बालकाचा करून अंत झाल्याची दुर्देवी घटना मंगळवारी (ता.५) उघडकीस आली. गौतम अनिल वाठोरे (वय १०) असे मृत बालकाचे नाव असून या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.

पतंग उडविण्यासाठी शेतात गेलेल्या दहा वर्षांच्या मुलाचा शेततळ्यात बुडून मृत्यू

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेेवा

वाशीम :  शहरातील अल्लाडा प्लॉट परिसरातील शेतशिवारात असलेल्या शेततळ्यामध्ये बुडाल्याने १० वर्षांच्या बालकाचा करून अंत झाल्याची दुर्देवी घटना मंगळवारी (ता.५) उघडकीस आली. गौतम अनिल वाठोरे (वय १०) असे मृत बालकाचे नाव असून या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.


अधिक माहितीनुसार, अल्लाडा प्लॉट परिसरात कालापाड यांची शेतजमीन आहे. याठिकाणी सिंचनासाठी त्यांनी १६ बाय २४ आकाराचे शेततळे घेतले. दरम्यान, पतंग उडविण्यासाठी परिसरातील गौतम वाठोरे हा बालक सोमवारी (ता.४) सकाळी ११ च्या सुमारास घरून निघाला होता. बराच वेळ गेल्यानंतरही तो परतला नसल्याने कुटुंब व परिसरातील नागरिकांनी त्याची शोधाशोध सुरू केली.

हेही वाचा - जिल्हा परिषदेचे १९ शिक्षक झाले कंत्राटी, वाचा काय असेल कारण

दरम्यान, परिसरातील कालापाड यांच्या शेतातील शेततळ्याजवळ त्याचे कपडे आढळून आले. सदर प्रकाराची माहिती पोलिसांना दिल्यानंतर नगरपालिकेच्या अग्निशमन विभागाला पाचारण करून तलावात शोध मोहीम राबविण्यात आली.

हेही वाचा - अकोला जिल्ह्यातील बातम्यांसाठी क्लिक करा

दीड तास शोध घेतल्यानंतर अग्निशमन विभागाला सदर बालकाचा मृतदेह काढण्यात यश आले. दरम्यान, पतंगीच्या नादात गेलेल्या बालकाला पोहणे येत नसताना शेततळ्यात पोहण्याचा मोह आवरता न आल्याने सदर दुर्देवी घटना घडल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. शेततळ्यात बुडालेल्या बालकाचा मृतदेह काढण्यासाठी नगरपालिका अग्निशमन विभागाचे पर्यवेक्षक विवेक माकोडे, दिनू सुरोशे, रवी सुरोशे, साईनाथ सुरोशे, सोनू डोंगरे, संतोष आळणे, विठ्ठल ठोंबरे, धीरज काकडे यांनी परिश्रम घेतले.

(संपादन - विवेक मेतकर)

loading image