
थकीत कर्ज व इतर कारणांमुळे आत्महत्या करणाऱ्या शेतकरी आत्महत्यांच्या १५ प्रकरणांना शासकीय मदतीसाठी पात्र ठरविण्यात आले आहे.
अकोला : थकीत कर्ज व इतर कारणांमुळे आत्महत्या करणाऱ्या शेतकरी आत्महत्यांच्या १५ प्रकरणांना शासकीय मदतीसाठी पात्र ठरविण्यात आले आहे.
त्यासोबतच एक प्रकरण अपात्र करून दोन प्रकरणाची फेरचौकशी करण्यात येईल. यासंबंधी सोमवारी (ता. ११) जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हास्तरीय समितीची बैठक पार पडल्यानंतर शेतकरी आत्महत्येच्या प्रकरणांना मंजुरी देण्यात आली.
हेही वाचा - ‘कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी’, कान्हेरीच्या विठ्ठलाने शेतीलाच केले ‘पंढरी’
बॅंक व सावकाराकडून घेतलेले कर्ज, नापिकी व लावगडीचा न परवाडा खर्च व इतर कामांमुळे मृत पावलेल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या प्रकरणांना शासकीय मदतीसाठी पात्र, अपात्र ठरविण्यासाठी सोमवारी (ता. ११) जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हास्तरीय समितीची बैठक पार पडली.
हेही वाचा - जिल्हा परिषदेची बियाणे वितरण योजनेत पाच हजार शेतकरी लाभापासून वंचितच!
बैठकीत १५ शेतकरी आत्महत्यांच्या प्रकरणांना शासकीय मदतीसाठी पात्र ठरविण्यात आले. त्यामध्ये अकोट तालुक्यातील श्रेयश धांडे (आसेगाव बाजार), गजानन रोहणकार (बोर्डी), रमेश ठोकळ (बळेगाव). पातूर तालुक्यातील संदीप शेळके (सस्ती). अकोला तालुक्यातील जगन्नानथ राऊत (निपाणा), रामराव गाडे (दहिहांडा), दीपक वानखडे (शिवापूर), गुणवंत भटकर (लोणाग्रा), दीपक घाटोळे, गजानन वानखडे (म्हातोडी), विकास ढोके (पळसो खु.). तेल्हारा तालुक्यातील मनोहर बोदडे (निंभोरा), अरूण खुमकर (बेलखेड), राहुल खारोडे (वाडी अदमपूर) व मूर्तिजापूर तालुक्यातील मुकिंदा इंगळे (जामठी) यांच्या आत्महत्या प्रकरणांचा समावेश आहे. याव्यतिरीक्त समितीने शेतकऱ्याचा एका प्रकरणाला अपात्र तर दोन प्रकरणाला फेरचौकशीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
(संपादन - विवेक मेतकर)