नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी कोरोनाचे १७ नवे पॉझिटिव्ह; एकाचा बळी

सकाळ वृत्तसेेवा
Saturday, 2 January 2021

  कोरोना संसर्गाचे शुक्रवारी (ता. १) १७ नवे रुग्ण आढळले. याव्यतिरीक्त एक रुग्णाचा मृत्यू झाला. संबंधित रुग्ण अकोट येथील ७७ वर्षीय पुरुष होते. त्यांना १९ डिसेंबर रोजी दाखल करण्यात आले होते. सदर मृत्यूमुळे जिल्ह्यातील एकूण कोरोना बळींची संख्या ३२३ झाली आहे.

अकोला :  कोरोना संसर्गाचे शुक्रवारी (ता. १) १७ नवे रुग्ण आढळले. याव्यतिरीक्त एक रुग्णाचा मृत्यू झाला. संबंधित रुग्ण अकोट येथील ७७ वर्षीय पुरुष होते. त्यांना १९ डिसेंबर रोजी दाखल करण्यात आले होते. सदर मृत्यूमुळे जिल्ह्यातील एकूण कोरोना बळींची संख्या ३२३ झाली आहे.

गेले वर्षभर छळणाऱ्या कोरोनाचे नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी रुग्ण घटल्याने दिलासा मिळाला आहे.

हेही वाचा - उद्‍ध्वस्त खरीपावर सरकारी माेहाेर; शेतकऱ्यांना मिळणार सवलती

कोरोना संसर्ग तपासणीचे शुक्रवारी (ता. १) २६९ अहवाल प्राप्त झाले. त्यापैकी २५२ अहवाल निगेटिव्ह तर १७ अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यात पाच महिला व १२ पुरुषांचा समावेश आहे. त्यातील अकोट, न्यू खेतान नगर व गोरक्षण रोड येथील प्रत्येकी दोन, तर उर्वरित कमल सोसायटी, कौलखेड, बार्शीटाकळी, कैलास नगर, कुटसा ता. अकोट, जोगलेश्वर, तारफैल, राऊतवाडी, मनकर्णा प्लॉट, खडकी व अकोला फैल येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवाशी आहेत. दरम्यान, दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून १२ जणांना डिस्चार्ज देण्यात आला.

हेही वाचा -अकोला जिल्ह्यातील बातम्यांसाठी क्लिक करा

कोरोनाची सध्यस्थिती
- एकूण पॉझिटिव्ह - १०५०६
- मृत - ३२३
- डिस्चार्ज - ९७५९
- ॲक्टिव्ह पॉझिटिव्ह - ४२४

(संपादन - विवेक मेतकर)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Akola Marathi News 17 new positives of Corona on the first day of the new year; The victim of one