esakal | बस थांबली, महामार्ग ठप्प!, दहा किलोमीटरपर्यंत लागल्या वाहनांच्या रांगा
sakal

बोलून बातमी शोधा

Akola Marathi News Bus stopped highway jammed queues of vehicles up to ten kilometers

 राष्ट्रीय महामार्गावर गुरुवारी प्रवास करणे चांगलेच डोकेदुखी ठरले. मंगरूळपीर आगाराच्या बसचे ॲक्सल रिधोऱ्याजवळ अंबुजा फॅक्ट्रीच्या जवळ तुटल्याने वाहतुकीचा खोळंबा झाला. रस्त्याच्या मध्येच बस रुसून बसल्याने दोन्ही बाजूने दहा किलोमीटरपर्यंत रांगा लागल्या होत्या.

बस थांबली, महामार्ग ठप्प!, दहा किलोमीटरपर्यंत लागल्या वाहनांच्या रांगा

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेेवा

बाळापूर (जि.अकोला) :   राष्ट्रीय महामार्गावर गुरुवारी प्रवास करणे चांगलेच डोकेदुखी ठरले. मंगरूळपीर आगाराच्या बसचे ॲक्सल रिधोऱ्याजवळ अंबुजा फॅक्ट्रीच्या जवळ तुटल्याने वाहतुकीचा खोळंबा झाला. रस्त्याच्या मध्येच बस रुसून बसल्याने दोन्ही बाजूने दहा किलोमीटरपर्यंत रांगा लागल्या होत्या.

अकोला ते बाळापूर दरम्यान गुरुवारी दुपारी माहार्गावर वाहतुक खोळंबली होती. मंगळरुळपीर येथून बुलडाणाकरिता निघालेली बस (एमएच ४० एन ८२८८) अकोला बस स्थानकावरून पुढे गेल्यानंतर रिधोऱ्या जवळ अंबुजा फॅक्ट्रीच्या बाजूला बंद पडली

हेही वाचा - राजकीय वर्तुळात रंगली चर्चा; भाजप आमदारांना बैठकीपासून दूर ठेवून साधला हेतू

. बसचे ॲक्सल तुटल्याने रस्त्याच्या मध्येच बस थांबली होती. आधीच अरुंद रस्ता असल्याने व त्यात बस मध्येच थांबल्याने वाहतूक ठप्प झाली होती. महामार्गावर दोन्ही बाजूने दहा किलोमीटरपर्यंत लांबच लांबर वाहनांच्या रांगा दिसून आल्यात. पोलिसांनी वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न केले. दोन्ही बाजूकडील वाहतूक सुरळीत होण्यासाठी चार तासापेक्षा अधिक काळ लागला.

हेही वाचा - जिल्हा बँक निवडणुक; मतदार अज्ञातस्थळी; उमेदवारीचा गुंता कायम

रस्ता बांधकाम रखडल्याने वाढल्या अडचणी
अमरावती ते चिखली (जळगाव) हा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा पाच वर्षांपासून खोदून ठेवला आहे. काम रखल्याने अनेक ठिकाणी अरुंद रस्त्यावरून वाहतूक सुरू आहे. त्यातच जड वाहतुक मोठ्याप्रमाणावर असल्याने महामार्गावर वारंवार वाहतुकीचा खोळंबा होतो.

हेही वाचा - पहिलाच प्रयोग; अकोल्यात साकारतेय चाईल्ड फ्रेंडली पोलिस ठाणे

नादुरुस्त बसने प्रवाशांचा जीव धोक्यात
एसटी महामंडळाच्या अनेक बस नादुरुस्त आहेत. अशा प्रकारे कुठेही बस नादुरुस्त होऊन थांबतात. त्यामुळे प्रवाशांना नाहक मनः स्थाप सहन करावा लागतो. नादुरुस्त बसेस रस्त्यावर धावत असल्याने प्रवाशांचा जीवही धोक्यात आहे.

अकोला जिल्ह्यातील ताज्या बातम्या - क्लिक करा

संपादन - विवेक मेतकर

loading image