esakal | शेतकऱ्यांच्या सोयीकरिता सर्व योजना एकाच अर्जाद्वारे, महाडीबीटी पोर्टल योजनेचा लाभ घ्या!
sakal

बोलून बातमी शोधा

Akola Marathi News For the convenience of farmers, all the schemes through a single application, take advantage of the MahaDBT portal scheme!

कृषी विभागाने आता महा-डीबीटी पोर्टलवर ‘शेतकरी योजना’ या सदराखाली शेतकऱ्यांच्या सोयीकरिता सर्व योजनांचा लाभ ‘एकाच अर्जाद्वारे’ देण्यासाठी अर्ज करण्यापासून ते प्रत्यक्ष लाभ मिळेपर्यंत एकात्मिक संगणकीय प्रणाली विकसित केली आहे, अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी दिली आहे.

शेतकऱ्यांच्या सोयीकरिता सर्व योजना एकाच अर्जाद्वारे, महाडीबीटी पोर्टल योजनेचा लाभ घ्या!

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेेवा

अकोला :  कृषी विभागाने आता महा-डीबीटी पोर्टलवर ‘शेतकरी योजना’ या सदराखाली शेतकऱ्यांच्या सोयीकरिता सर्व योजनांचा लाभ ‘एकाच अर्जाद्वारे’ देण्यासाठी अर्ज करण्यापासून ते प्रत्यक्ष लाभ मिळेपर्यंत एकात्मिक संगणकीय प्रणाली विकसित केली आहे, अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी दिली आहे.

या प्रणालीद्वारे शेतकऱ्यांना त्यांच्या पसंतीच्या बाबींच्या निवडीचे स्वातंत्र्य देण्यात आले आहे. त्यासोबतच शेतकऱ्यांनी शेती निगडीत विविध बाबींकरिता अर्ज करता येणार आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी वैयक्तीक मोबाईल क्रमांक आधार कार्डशी संलग्न करणे आवश्यक आहे.

हेही वाचा -  उद्‍ध्वस्त खरीपावर सरकारी माेहाेर; शेतकऱ्यांना मिळणार सवलती

त्यानंतर महा-डीबीटी संकेतस्थळावरील ‘शेतकरी योजना’ हा पर्याय निवडावा. शेतकरी स्वतःच्या मोबाईल, संगणक, लॅपटॅाप, टॅबलेट, सामूदायिक सेवा केंद्र, ग्रामपंचायतीतील संग्राम केंद्र इत्यादी माध्यमातून पोर्टलवर जाऊन अर्ज करू शकतील. ‘वैयक्तीक लाभार्थी’ म्हणून नोंदणी करू इच्छीणाऱ्या सर्व शेतकऱ्यांना त्यांचा आधार क्रमांक सदर संकेतस्थळावर प्रमाणित करून घ्यावा लागेल. ज्या वापरकर्त्यांकडे आधार क्रमांक नसेल त्यांनी प्रथम आधार नोंदणी केंद्राकडे जाऊन त्यांची नोंदणी करावी व सदर नोंदणी क्रमांक महा-डीबीटी पोर्टलमध्ये नमूद करून त्यांना योजनांसाठी अर्ज करता येईल. अशा अर्जदारांना अनुदान वितरीत करण्यापूर्वी महा-डीबीटी पोर्टलमध्ये त्यांना देण्यात येणारा आधार क्रमांक नोंदणीकृत करून प्रमाणित करून घ्यावा लागेल, त्याशिवाय त्यांना अनुदानाचे वितरण करण्यात येणार नाही.

हेही वाचा -  अकोला जिल्ह्यातील बातम्यांसाठी क्लिक करा

सर्व प्रक्रिया ऑनलाईन
पोर्टलवरील प्राप्त अर्जांची ऑनलाईन लॉटरी, पूर्व संमती देणे, मोका तपासणी तसेच निवड झालेल्या लाभार्थ्यांच्या खात्यावर थेट अनुदान वितरण करणे इत्यादी सर्व प्रक्रिया ऑनलाईन होणार आहे. महाडीबीटी पोर्टलवर माहिती भरण्याची कार्यवाही सुरू झाली आहे. यापूर्वीच अर्जदारांनी माहिती भरली असल्यास पुन्हा भरण्याची आवश्यकता नाही. मात्र लाभाच्या घटकांमध्ये शेतकरी बदल करू शकतात. ज्या शेतकरी बांधवांनी महा-डीबीटी पोर्टलवर कृषी विषयक योजनाचा लाभ मिळवण्यासाठी अद्याप अर्ज केला नसेल, त्यांनी १० जानेवारीअखेर पर्यंत आपले अर्ज पोर्टलवर भरावेत. या तारखेपर्यंत प्राप्त सर्व अर्ज लॉटरीसाठी ग्राह्य धरले जातील. तरी सर्व इच्छुक शेतकऱ्यांनी महा-डीबीटी पोर्टलवर नाव नोंदणी करण्याचे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी केले आहे.

(संपादन - विवेक मेतकर)

loading image