
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून बुधवारी कोरोना संसर्ग तपासणीचे २४३ अहवाल प्राप्त झाले. त्यातील २३० अहवाल निगेटीव्ह तर १३ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. आज १०९ रुग्ण आजारातून बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला.
अकोला : शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून बुधवारी कोरोना संसर्ग तपासणीचे २४३ अहवाल प्राप्त झाले. त्यातील २३० अहवाल निगेटीव्ह तर १३ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. आज १०९ रुग्ण आजारातून बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. बुधवारी दिवसभरात १३ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आलेत. त्यात सात महिला व सहा पुरुषांचा समावेश आहे. त्यातील आश्रयनगर येथील तीन, आदर्श कॉलनी व बाबुळगाव येथील प्रत्येकी दोन, तर उर्वरित जीएमसी हॉस्टेल, काँग्रेस नगर, मुंडगाव, टेलीग्राफ कॉलनी मुकूंद नगर, माधवनगर व दत्ता कॉलनी गोरक्षण रोड येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहे. आज सायंकाळी कोणाचाही अहवाल पॉझिटीव्ह आला नाही. दरम्यान आज दुपारनंतर आयकॉन हॉस्पिटल येथून तीन, ओझोन हॉस्पिटल येथून एक, हॉटेल स्कायलार्क येथून चार, हॉटेल रिजेन्सी येथून एक तर बिहाडे हॉस्पिटल येथून चार तसेच होम आयसोलेशन मधील ९६, अशा एकूण १०९ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली. आता अकोला जिल्ह्यात ३९५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ३१९ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. संपादन - विवेक मेतकर)
|
|||