
कोरोना संसर्ग तपासणीचे मंगळवारी (ता. ५) एक हजार ४ अहवाल प्राप्त झाले. त्यापैकी ९४७ अहवाल निगेटिव्ह तर ५७ अहवाल पॉझिटिव्ह आले. याव्यतिरीक्त १५ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. त्यामुळे आता जिल्ह्यात ५०७ रुग्णांवर उपचार सुरा आहेत.
अकोला : कोरोना संसर्ग तपासणीचे मंगळवारी (ता. ५) एक हजार ४ अहवाल प्राप्त झाले. त्यापैकी ९४७ अहवाल निगेटिव्ह तर ५७ अहवाल पॉझिटिव्ह आले. याव्यतिरीक्त १५ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. त्यामुळे आता जिल्ह्यात ५०७ रुग्णांवर उपचार सुरा आहेत. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आजपर्यंत एकूण ७२ हजार २४६ जणांचे अहवाल आले आहेत. त्यात प्राथमिक तपासणीचे ७० हजार ५७९ फेरतपासणीचे २९२ तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे १ हजार ३७७ नमुने होते. त्यापैकी ७२ हजार १७५ अहवाल प्राप्त झाले आहेत. हेही वाचा - अर्थसंकल्पाची तरतुद 165 कोटींची, खर्च फक्त 15 कोटी 60 लाखांचा एकूण निगेटिव्ह अहवालांची संख्या ६३ हजार ५७८ तर पॉझिटिव्ह अहवाल १० हजार ६८७ आहेत. याव्यतिरीक्त मंगळवारी (ता. ५) दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून तीन जणांना, ओझोन हॉस्पिटल येथून एक, हॉटेल स्कायलार्क येथून चार, हॉटेल रेजेन्सी येथून एक, तर बिहाडे हॉस्पीटल येथून दोन, तसेच होम आयसोलेशन येथून चार, अशा एकूण १५ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. या भागात आढळले नवे रुग्ण हेही वाचा - अकोला जिल्ह्यातील बातम्यांसाठी क्लिक करा कोरोनाची सद्यस्थिती (संपादन - विवेक मेतकर)
|
|||