
गुन्हेगारीला आळा बसणेकरिता अकोला जिल्हात टोळीने गुन्हे करणाऱ्या गुन्हेगारांवर कारवाई केली जात आहे. त्याअनुषंगाने अकोट फैल पोलिस स्टेएशनच्या हद्दीत टोळीने गुन्हे करणाऱ्यांना दोन वर्षांसाठी जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे.
अकोला : गुन्हेगारीला आळा बसणेकरिता अकोला जिल्हात टोळीने गुन्हे करणाऱ्या गुन्हेगारांवर कारवाई केली जात आहे. त्याअनुषंगाने अकोट फैल पोलिस स्टेएशनच्या हद्दीत टोळीने गुन्हे करणाऱ्यांना दोन वर्षांसाठी जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे. जिल्हा पोलिस अधीक्षकांनी दिलेल्या आदेशानुसार जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आलेल्यांमध्ये उस्मान शहा लुकमान शहा (वय ३४), मुस्ताक शहा लियाकत शहा (वय ४२), कयुम शहा करीम शहा (वय ३४), जावेद शहा लतीफ शहा (वय २६), ईस्माईल शहा कादर शहा (वय २८) या पुरपिडीत क्वॉटरमध्ये राहणाऱ्या गुंडांचा समावेश आहे. या गुन्हेगारांवरील गुन्ह्यांची मलिका पाहता त्यांचे विरुध्द कलम ५५ महाराष्ट्र पोलिस अधिनियमान्वये अकोला जिल्ह्यातून २ वर्षांकरिता हद्दपार करण्याबाबतचा प्रस्ताव तयार करून पोलिस अधीक्षक यांचे कडे सादर केला होता. या प्रस्तावानुसार ५ जानेवारी रोजी पोलिस अधीक्षक जी. श्रीधर यांनी सर्व गुन्हेगारांच्या हद्दपारीचा आदेश दिला. (संपादन - विवेक मेतकर) |
|||