
कोरोना संसर्गामुळे गत मार्च महिन्यांपासून शाळेची घंटा वाजलीच नाही. काही ठिकाणी नववी ते बारावी चे वर्ग सुरू झाले. मात्र, इतर वर्गासाठी शाळेची घंटा विसरल्या गत झाली आहे. आता २०२०-२१ शैक्षणिक सत्र अंतिम टप्प्यात आले. तरी संसर्गाच्या भीतीमुळे अजूनही शाळेची घंटा वाजणार नाही. अशीच शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे आता नवीन सत्रातच शाळेची घंटा वाजणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
शिरपूर जैन (जि.वाशीम) : कोरोना संसर्गामुळे गत मार्च महिन्यांपासून शाळेची घंटा वाजलीच नाही. काही ठिकाणी नववी ते बारावी चे वर्ग सुरू झाले. मात्र, इतर वर्गासाठी शाळेची घंटा विसरल्या गत झाली आहे. आता २०२०-२१ शैक्षणिक सत्र अंतिम टप्प्यात आले. तरी संसर्गाच्या भीतीमुळे अजूनही शाळेची घंटा वाजणार नाही. अशीच शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे आता नवीन सत्रातच शाळेची घंटा वाजणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
गत मार्च महिन्यांपासून कोरोनाचा उद्रेक सुरूच आहे. त्यामुळे सुरक्षिततेचा उपाय म्हणून शाळा-कॉलेज, कोचिंग क्लासेस बंद ठेवण्याचे आदेश शासनाकडून देण्यात आलेत. दरम्यान, गत महिन्यापासून नववी ते बारावी चे वर्ग सुरू करण्याची परवानगी देण्यात आली.
वर्ग १० व १२ वीचे विद्यार्थी काही प्रमाणात शाळेत दाखल होत आहेत. त्यातही विद्यार्थ्यांची पूर्ण संख्या नसून शैक्षणिक सत्र २०२०-२१ हे वाया जाणार असल्याचे चिन्हे दिसू लागली आहेत. पहिली ते आठवीपर्यंतच्या वर्गांना अद्यापही केंद्र सरकारकडून हिरवी झेंडी मिळाली नाही.
हेही वाचा - चालत्या बसमध्ये महिलेला अचानक सुरू झाल्या प्रसुतीकळा, कंडक्टरच्या लक्षात येताच
त्यामुळे शाळा द्वारे ऑनलाइन शिक्षणाची पद्धत राबविण्यात येत आहे. याचा उद्देश विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, मात्र यातही ग्रामीण भागात नेटवर्क नसणे, नेट मिळत नसणे यामुळे बरेचसे विद्यार्थी शिक्षणापासून दूर राहिले आहेत. तर बोर्डाची परीक्षा असल्याने वर्ग १० वी व १२ वीचे विद्यार्थी काही प्रमाणात शाळेत येऊ लागलेत. त्यातही राज्यात काही ठिकाणी कोरोनाचा धोका असल्याने अद्याप कुठलेच वर्ग शाळेत भरणार नाहीत. आता या सत्रातील परीक्षा देखील ऑनलाईनच घेण्यात येतील अशी शक्यता निर्माण झाली आहे.
हेही वाचा - अकोला जिल्ह्यातील बातम्यांसाठी क्लिक करा
मात्र, ज्या ग्रामीण विद्यार्थ्यांना नेटवर्क, नेट मिळत नाही. शिक्षण घेण्याची इच्छा असूनही असल्या तांत्रिक अडचणींमुळे ते शिक्षण घेऊ शकत नाही अशा विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होत आहे. या सत्राचा शेवटचा टप्पा आला असून, कोरोना संसर्गाच्या भीतीने अजूनही शाळा सुरू होणार नाहीत हे स्पष्टपणे दिसत आहे. आता विद्यार्थ्यांसाठी अभ्यासक्रमाचे व परीक्षेचे पॅटर्न काय असेल?अभ्यास किती असेल? याबाबत विद्यार्थ्यात संभ्रम कायम आहे. कोरोनामुळे यंदा शाळेची घंटा वाजली नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांनाही या घंटेचा विसर पडला आहे.
(संपादन - विवेक मेतकर)
हेही वाचा -
पहिल्या टप्प्यात सात हजार फ्रंटलाईन वर्करला मिळणार कोरोनाची लस!
उद्ध्वस्त खरीपावर सरकारी माेहाेर; शेतकऱ्यांना मिळणार सवलती
तुम्हाला गौळण, अभंग, पोवाडा, भारूड येतयं तर करा अर्ज, मुदत आहे २१ जानेवारीची
शेतकऱ्यांच्या सोयीकरिता सर्व योजना एकाच अर्जाद्वारे, महाडीबीटी पोर्टल योजनेचा लाभ घ्या!