आघाडी सरकारला जनतेच्या आरोग्याची पर्वा नाही - भाजपचा आरोप

सकाळ वृत्तसेेवा
Thursday, 14 January 2021

निमवाडी परिसरातील सुपर स्पेशालिटी रुग्णालय सुरू करण्यासाठी एक हजार २६ पदांची आवश्यकता आहे. परंतु राज्य सरकारने अकोला जिल्ह्यासाठी केवळ २२३ पदं मंजुर केले आहेत. त्यामुळे येथील रुग्णालयास कमी मनुष्यबळ उपलब्ध होईल व रुग्णांची गैरसोय होईल. परिणामी तुटपुंजी पदभरती अन्यायकारक असल्याचा आरोप जिल्हा भाजपने प्रसिद्धी पत्रकाच्या माध्यामातून केला आहे.

अकोला : निमवाडी परिसरातील सुपर स्पेशालिटी रुग्णालय सुरू करण्यासाठी एक हजार २६ पदांची आवश्यकता आहे. परंतु राज्य सरकारने अकोला जिल्ह्यासाठी केवळ २२३ पदं मंजुर केले आहेत. त्यामुळे येथील रुग्णालयास कमी मनुष्यबळ उपलब्ध होईल व रुग्णांची गैरसोय होईल. परिणामी तुटपुंजी पदभरती अन्यायकारक असल्याचा आरोप जिल्हा भाजपने प्रसिद्धी पत्रकाच्या माध्यामातून केला आहे.

भाजपने केलेल्या पाठपुरव्यानंतर सदर रुग्णालयाचे बांधकाम पूर्ण झाले, परंतु महाविकास आघाडी सरकारने जनतेचा अपमान केल्याचा आरोपही भाजपने केला आहे.

हेही वाचा - कशी नशिबानं थट्टा आज मांडली!, स्मशानभूमीचा रस्ता अडविल्याने अंत्ययात्रा थांबली, अंत्यसंस्कारासाठी चार तासापासून प्रेत रस्त्यावर

अकोला जिल्ह्यात बुलढाणा, वाशीम, यवतमाळ, अमरावती जिल्ह्यांसह इतर जिल्ह्यातील रुग्ण विविध प्रकारचे उपचार घेण्यसाठी येतात. त्यामुळे येथील सर्वोपचार रुग्णालयावर कामाचा ताण आहे. ही बाब लक्षात घेवून भाजपच्या काळात केंद्र सरकारने अकोला येथे सुपर स्पेशालिटी रुग्णालय सुरू करण्यास मंजुरी दिली.

त्यासाठी ८० टक्के निधी केंद्र सरकारने दिला आहे. परंतु त्यानंतर सुद्धा राज्यातील महाविकास आघाडी सरकारने रुग्णालयासाठी केवळ २५ टक्के निधी जागा सुद्धा भरण्यास परवानगी दिली नाही. त्यामुळे येथील रुग्णावर घोर अन्याय होत असल्याचा आरोप भाजपने प्रसिद्धी पत्रकाच्या माध्यमातून केला आहे.

हेही वाचा - शाळेची घंटा विसरली आता, आला सत्राचा अंतिम टप्पा!, पहिली ते आठवीपर्यंत विद्यार्थ्यांना नो एंट्री

फडणवीस सरकारने याआधी ४९८ जागांचा प्रस्ताव मंजूर केला होता. त्यापैकी ५० टक्के जागांचा प्रस्ताव सुद्धा शासनाने मंजूर केला नाही. यावरून सरकारच्या करणी व कथणीत फरक असल्याचे सिद्ध होते. बोलायचे काय आणि करायचे काय असा हा प्रकार सध्या महाविकास आघाडी सरकार करत असल्याचा आरोप भाजपने केला आहे.

हेही वाचा - चालत्या बसमध्ये महिलेला अचानक सुरू झाल्या प्रसुतीकळा, कंडक्टरच्या लक्षात येताच

असुविधा निर्माण करण्याचा प्रयत्न
राज्य सरकारचे काम जनतेला सुविधा देण्याचे असताना सरकार असुविधा निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे, असा आरोप सुद्धा जिल्हा भाजपा अध्यक्ष, आमदार रणधीर सावरकर यांच्या नेतृत्वात भाजपाने केला आहे. दरम्यान तुटपुंच्या पद निर्मितीवर सरकारने पुन्हा विचार करावा, अशी मागणी केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे यांच्या मार्गदर्शनात जिल्हा भाजपा अध्यक्ष, आमदार रणधीर सावरकर, आमदार गोवर्धन शर्मा, आमदार प्रकाश भारसाकळे, आमदार हरीश पिंपळे, महानगराध्यक्ष विजय अग्रवाल, महापौर अर्चना मसने, तेजराव थोरात, किशोर पाटील व इतरांनी सरकारकडे केली आहे.

(संपादन - विवेक मेतकर)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Akola Marathi News Government has no public health festival - BJP alleges