
रशियात वीण करणारी व मुख्यत्वे अफ्रीका आणि दक्षिण-उत्तर अशियात स्थलांतर करणारी लालकंठी तीरचिमणी कापशी तलावावर पहिल्यांदाच आढळून आली आहे.
अकोला : रशियात वीण करणारी व मुख्यत्वे अफ्रीका आणि दक्षिण-उत्तर अशियात स्थलांतर करणारी लालकंठी तीरचिमणी कापशी तलावावर पहिल्यांदाच आढळून आली आहे. स्थलांचराच्या काळात ही चिमणी भारतात काही अवधी विसावा घेण्यासाठी थांबते. ‘रेड थ्रोटेड पिपिट’ (लालकंठी तीरचिमणी) नावाने परिचित असलेल्या या चिमणीची विदर्भातील ही पहिलीच नोंद आहे, हे विशेष. हेही वाचा - चालत्या बसमध्ये महिलेला अचानक सुरू झाल्या प्रसुतीकळा, कंडक्टरच्या लक्षात येताच पक्षीमित्र व अभ्यासक समिश धोंगळे यांना ३ जानेवारी रोजी कापशी तलावावर एक अनवट तीरचिमणी दिसून आली. त्यांनी लगेच तिचे छायाचित्र काढले. ते पडताळून बघितले असता ती लाल कंठाची तीरचिमणी असल्याचे लक्षात आले. पक्षी अभ्यासक निनाद अभंग यांनी या तीरचिमणीची विदर्भातील ही पहिलीच व दुर्मिळ नोंद असल्याची पुष्टी केली आहे. ही नोंद विदर्भासाठी मोठी असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले. हेही वाचा - अकोला जिल्ह्यातील बातम्यांसाठी क्लिक करा कापशी जलाशयावर नेहमी पक्ष्यांची गर्दी असते. मात्र, यंदा तलावाच्या खोलीकरणामुळे अन्नसाखळी विस्कटली आहे. त्यामुळे पाणपक्षांनी या तलावाकडे पाठ फिरवलेली दिसून येत आहे. स्थलांतरित पक्षांच्या परतीच्या वेळी म्हणजे मार्च-एप्रिल महिन्यात या जलाशयावर पक्षांची संख्या वाढू शकते, असा आशावाद समिश धोंगळे यांनी व्यक्त केला आहे. (संपादन - विवेक मेतकर) |
|||