महाबिजच्या ‘त्या’ बियाण्याची रक्कम महाबीज शेतकऱ्यांच्या खात्यात करणार जमा

अनुप ताले 
Thursday, 30 July 2020

महाबीजचे बियाणे उगवलेच नाही, अशा राज्यभरातून शेतकऱ्यांनी तक्रारी केल्या होत्या. त्यांचेपैकी काही शेतकऱ्यांना बियाणे बदलून देण्यात आले आहे तर, ज्यांनी बियाणे घेण्यास नकार दिला, त्यांच्या बँक खात्यात बियाण्याच्या किमतीची रक्कम जमा करण्यात येत असल्याची माहिती महाबीजकडून देण्यात आली आहे.

अकोला  ः महाबीजचे बियाणे उगवलेच नाही, अशा राज्यभरातून शेतकऱ्यांनी तक्रारी केल्या होत्या. त्यांचेपैकी काही शेतकऱ्यांना बियाणे बदलून देण्यात आले आहे तर, ज्यांनी बियाणे घेण्यास नकार दिला, त्यांच्या बँक खात्यात बियाण्याच्या किमतीची रक्कम जमा करण्यात येत असल्याची माहिती महाबीजकडून देण्यात आली आहे.

खरीप २०२० करीता राज्यभरातील शेतकऱ्यांनी यंदाही महाबीजच्या सोयाबीन बियाणे पेरण्यासाठी पसंती दर्शविली होती. परंतु, बहुतांश भागातून बियाणे उगवलेच नाही, कमी भरले, निकृष्ट निघाले, शेतकऱ्यांकडून अशा प्रकारच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या.

अकोला जिल्ह्यातील बातम्यांसाठी क्लिक करा

त्यामुळे महामंडळामार्फत अशा शेतकऱ्यांना ३२५०.१० क्विंटल बियाणे पुनरपेरणीकरिता उपलब्ध करून देण्यात आले असून, त्यापैकी आजपर्यंत ६१० शेतकऱ्यांनी ५८ लाख रुपयांची ७७९.९० क्विंटल बियाण्याची उचल केल्याची माहिती महाबीजने दिली आहे.

परंतु ज्या शेतकऱ्यांनी बियाणे घेण्यास नकार दिला, अशा शेतकऱ्यांना तालुकास्तरीय बियाणे तक्रार निवारण समितीचे अहवाल तसेच बाधित शेतकऱ्यांच्या बँक खात्याची माहिती घेवून, बियाणे किमतीची रक्कम त्यांचे खात्यात जमा करण्याची प्रक्रिया सुरू करण्याची आल्याचे व आजपर्यंत १९.१२ लाख रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आल्याचे महाबीज प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.
(संपादन - विवेक मेतकर)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Akola Marathi News Mahabeej will deposit the amount of those seeds in the account of Mahabeej farmers