सकाळी झुंबड; दुपारनंतर शुकशुकाट!

Akola Marathi News Morning crowd; Dry in the afternoon!
Akola Marathi News Morning crowd; Dry in the afternoon!

अकाेला :  कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग लक्षात घेता अकोला महानगरपालिकेच्या हद्दीत ता. २३ फेब्रुवारीपासून टाळेबंदी लागू करण्यात आली. पहिल्या दिवशी नागरिकांनी बाजारपेठेत खरेदीसाठी झुंबड केली.

दुपारी ३ वाजतानंतर मात्र शहरातील रस्ते व बाजारपेठेत शुकशुकाट दिसून आला. पेट्राेलपंपावर शेकटो वाहनांच्या रांगा होता. त्यात नियमांचे पालन होताना दिसले नाही. त्यामुळे पोलिसांची चांगलीच तारांबळ उडाली.

हेही वाचा - शहरातील फक्त पाच पेट्रोलपंप अत्यावश्यक सेवेसाठी राहणार सुरू

जिल्ह्यात काेराेना विषाणूचा संसर्ग वाढत असून, समूह संसर्गाला सुरुवात झाल्याचे दिसून येत आहे. दररोज रुग्ण संख्या वाढत आहे. त्यामुळे शासनाच्या मार्गदर्शक सूचना व विभागीय आयुक्तांच्या निर्देशाप्रमाणे अकोला जिल्हाधिकाऱ्यांनी प्रतिबंधात्मक क्षेत्रासाठी निर्बंध लागू केले आहेत. या निर्बंधांची अंमलबजावणी ता. २३ फेब्रुवारीपासून सुरु झाली आहे. सर्व प्रकारची जीवनावश्यक दुकाने, किराणा, दूध विक्री, स्वस्त धान्य दुकाने ही सकाळी ८ ते दुपारी ३ वाजेपर्यंत सुरू हाेती. काही ठिकाणी बिगर आवश्यक दुकानेही सुरू केल्याचे आढळून आले. शहरातील सर्व परिसरात जीवनावश्यक वस्तूंच्या अनेक दुकानांवर ग्राहकांनी गर्दी केली हाेती. रस्त्यावर भाजीची विक्री सुरू हाेत. दुपारी ३ नंतर मात्र दुकाने बंद झाली. काही दुकानदारांनी दुपारी तीनची वेळ पाळली नाही. त्यामुळे पोलिस प्रशासनाने शहरात गाडी फिरवून व्यावासायिकांना दुकाने बंद करण्याची व नागरिकांना रस्त्यावर न फिरण्यासंदर्भात सूचना दिली.

पेट्राेलपंपावर उसळली गर्दी
शहरातील मोजकेच पेट्राेलपंप दुपारी तीननंतर अत्यावश्यक सेवेसाठी सुरू राहणार आहेत. इतर पेट्रोलपंप दुपारी ३ वाजेपर्यंत सुरू राहणार असले तरी नागरिकांनी मंगळवारी टाळेबंदीच्या पहिल्याच दिवशी पंपांवर गर्दी केली. पंपांवर वाहनधारकांच्या रांगाला लागल्या होत्या. या गर्दीत नियमांचे पालन करताना कुणीही दिसून आले नाही.

हेही वाचा -  पाच पालिका प्रतिबंधित, जीवनावश्यक वगळता इतर सर्व दुकाने बंद

पोलिसांची तारांबळ
मंगळवारी दुपारी ३ वाजताच्या सुमारास सिटी काेतवाली पाेलिसांनी गांधी चाैैक ते ताजनापेठ चाैकादरम्यान गस्त घालून बाजारपेठेत जीवनावश्यक वस्तूशिवाय इतर दुकाने सुरू नाहीत ना याची पाहणी केली. भाजीपाला, फळ विक्रेत व मेडिकल स्टाेअर्स वगळता अन्य जीवनावश्यक वस्तूंच्या दुकांनांना बंदचे आवाहन पोलिस करताना दिसून आले. दुपारीही पोलिसांची चांगलीच तारांबळ उडाली. मात्र सर्व पोलिस स्टेशनच्या हद्दीत परिस्थिती सांभाळण्यात पोलिस परिश्रम घेताना दिसून आले.

मनपा प्रशासनाची हातावर घडी
एकीकडे टाळेबंदीची अंमलबजावणी करून घेताना पोलिसांची तारांबळ उडत असताना मनपा क्षेत्रातील प्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबत महानगरपालिका प्रशासन गांभिर्याने उपाययोजना करताना दिसले नाही. मनपाचे कर्मचारी बाजार कुठेही आढळून आले नाहीत. अतिक्रमण निर्मुलन पथकाने रस्त्यावर गाडी लावून व्यवसाय करणाऱ्यांना गाड्या लावण्यास मनाई केली. हे पथक वगळता मनपाचे कर्मचारी कुठेही फिरताना दिसून आले नाही.

हेही वाचा - 28 वर्षीय महिलेला तलाठ्याने शेतीच्या नोंदीसाठी केली मागणी

व्यापाऱ्यांमध्ये नाराजी
कोरोना संसर्ग प्रतिबंधासाठी उपाययोजना करताना प्रशासनाने जीवनावश्यक वस्तू वगळता इतर दुकाने बंद ठेवण्यास सांगितले. मात्र त्याचवेळी भाजी बाजारात, किराणा दुकाने व पेट्रोलपंपावर नागरिक गर्दी करताना दिसून आले. या गर्दीने कोरोना पसरत नाही आणि प्रामाणिकपणे नियमांचे पालन करून इतर बिगर जीवनावश्यक वस्तू विक्री करणाऱ्यांमुळे कोरोना पसरतो का, असा प्रश्न व्यापाऱ्यांनी उपस्थित केला आहे. वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी व कापड व्यावसायिक मनोहर पंचवाणी यांनी प्रशासनाकडून होत असलेला हा अन्याय दूर करण्याची मागणी केली आहे.

हातावर पोट असणाऱ्यांचे हाल
दररोज काम करून कुटुंबाचा प्रपंच चालविणारे किरोकोळ विक्रेत, मजूर, दुकानांमध्ये काम करणाऱ्या कामगारांचे मात्र लॉकडाउनमुळे हाल सुरू झाले आहे. प्रतिष्ठाणे बंद असल्याने मालकांनी मजुरांना बिनपगारी सुटी दिली आहे. किरकोळ साहित्य विक्री करणाऱ्यांच्या हाताला काम नसल्याने तेही आर्थिक अडचणीत सापडणार आहेत.

अकोला, बुलडाणा, वाशीम जिल्ह्यातील ताज्या बातम्या - क्लिक करा

संपादन - विवेक मेतकर

अधिक वाचा - 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com