प्रवाशी घेऊन जात असलेला ऑटो बिघडला, खाली उतरताच अज्ञात वाहन आले अन् क्षणात घडले असे काही

सकाळ वृत्तसेेवा
Thursday, 31 December 2020

मूर्तिजापूर येथून माना येथे आठ ते १० प्रवाशी घेऊन जात असलेल्या ऑटो क्रमांक एमएच ३० एए १४६८ मधली अचानक वायरिंग जळाल्याने धुर निघाला.

मूर्तिजापूर (जि.अकोला) : मूर्तिजापूर येथून माना येथे आठ ते १० प्रवाशी घेऊन जात असलेल्या ऑटो क्रमांक एमएच ३० एए १४६८ मधली अचानक वायरिंग जळाल्याने धुर निघाला.

चालकाने आपले वाहन थांबवून इतर प्रवाशांना खाली उतरविले.  राजू चक्रे (वय वर्षे २८), अनिल गोपाल कोकणे (वय वर्षे ४८) व दिनेश गंगाधर ढवळे (वय वर्षे ३४) राहणार माना हे तीघे ऑटोची वायरिंग तपासत असताना पाठी मागून येणाऱ्या अज्ञात वाहनाने धडक दिली. या धडकेत अनिल गोपाल कोकणे हा ठार झाला, तर ऑटो चालक राजू चक्रे हा गंभीररीत्या जखमी झाला आहे.

हेही वाचा - हे तर नवलंच! सातपुड्यातील ‘तेल्यादेवाला’ लागते तंबाखू, बिडी आणि सिगारेटही, जाणून घ्या रंजक कहाणी

त्यावर अकोला येथे उपचार करण्यात येत आहे. तर दिनेश गंगाधर ढवळे हा किरकोळ जखमी असून इतर महिला प्रवाशी महामार्गाच्या कडेला बसले असल्याने मोठा अनर्थ टळला.

धडकेने ऑटो रस्त्याच्या बाजूला असलेल्या खड्ड्यात जाऊन उलटला. दिनेश ढवळे याच्या फिर्यादी वरुन शहर पोलीसांनी अज्ञात वाहना विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक संगीता गावडे, पोलीस कॉन्स्टेबल योगेश उमक करीत आहे.

(संपादन - विवेक मेतकर)

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Akola Marathi News Murtijapur Youth dies in auto accident