शहरातील भाजीपाला हर्राशी तातडीने होणार बंद, वाचा व्यावसायिक काय म्हणतात

सकाळ वृत्तसेवा
Friday, 25 December 2020

शहरात मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या जनता भाजी बाजारात अवैधपणे सुरू असलेली भाजीपाला हर्राशी तातडीने बंद करण्यासाठी सावित्रीबाई ज्योतिबा फुले मुख्य भाजी बाजार गाळेधारक संस्थेच्यावतीने १ जानेवारीपासून उपोषणाचा इशारा देण्यात आला. गुरुवारी (ता.२४) संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेत याबाबत सविस्तर निवेदन केले.

अकोला : शहरात मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या जनता भाजी बाजारात अवैधपणे सुरू असलेली भाजीपाला हर्राशी तातडीने बंद करण्यासाठी सावित्रीबाई ज्योतिबा फुले मुख्य भाजी बाजार गाळेधारक संस्थेच्यावतीने १ जानेवारीपासून उपोषणाचा इशारा देण्यात आला. गुरुवारी (ता.२४) संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेत याबाबत सविस्तर निवेदन केले.

शहरातील लोणी मार्गावर असलेल्या बाजारात संस्‍थेचे अध्यक्ष राजेश डाहे, कोषाध्‍यक्ष प्रशांत चिंचोलकर, संचालक संतोष अंबरते, गणेश घोसे, अनिल गोलाईत, शिवा पल्लाडे, राजेश ढोले, अमोल गोलाईत, योगेश चापके, संजय कोकोटे, गजानन कातखेडे यांच्यासह इतर यावेळी पत्रकार परिषदेला उपस्थित होते. कोरोनाच्या काळात शहरातील मुख्य जनता भाजी बाजारातील भाजी विक्रेते लोणी मार्गावरील नव्या भाजी बाजारात स्थानांतरीत झाले आहेत.

हेही वाचा - शेतकऱ्यांच्या विश्वासाचं बियाणं करतंय दरवर्षी सहाशे कोटींची उलाढाल, महाबीजचा असा चालतो कारभार

तेथे गेल्या काही महिन्यांपासून हर्राशी सुरु आहे. मात्र, प्रशासनाची परवानगी नसताना जुन्या बाजारातही अद्याप काही जण हर्राशी करीत आहेत. यामुळे स्थानांतरीत झालेल्या भाजीपाला व्यावसायिक, गाळेधारकांवर अन्याय होत आहे. महानगरपालिका प्रशासनाच्या नाकर्तेपणामुळे हा प्रकार सुरु आहे. प्रशासनाने जुन्या भाजीबाजारातील हर्राशी बंद करावी अन्यथा लोणी मार्गावर गेलेल्या बाजारातील व्यावसायिकांनाही या ठिकाणी हर्राशीची परवानगी द्यावी अशी मागणी करण्यात आली आहे.

हेही वाचा - पाचशे रुपये द्या अन्यथा बाळ देणार नाही, प्रसुती झालेल्या महिलेची रुग्णालयाकडूनच अडवणूक

लोणी मार्गावर २२० भाजीपाला व्यावसायिकांनी एकत्र येत गाळे निर्मिती केली. कोरोनाच्या काळात प्रशासनाच्या सूचनेवरून मुख्य जनता भाजी बाजार बंद करून होलसेल हर्राशीचा व्यवसाय हा लोणी मार्गावरील नव्या भाजीबाजारात व्यवहार सुरु केले होते. शहरातील गर्दी, वाहतुक व इतर प्रश्‍न लक्षात घेता एकीकडे प्रशासन शहराबाहेर भाजी बाजार नेण्यास इच्छूक असून दुसरीकडे शहरातच जुन्या बाजारात व्यवहार होत आहेत.

हे नक्की पहा- आजच्या ताज्या घडामोडींसाठी क्लिक करा

दोन ठिकाणी व्यवसाय होत असल्याने शहराबाहेरील बाजारातील व्यावसायिकांचे नुकसान होत आहे. यामुळे प्रशासनाने या प्रश्‍नावर तातडीने तोडगा काढावा अशी मागणी पत्रकार परिषदेत करण्यात आली.

(संपादन - विवेक मेतकर)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Akola Marathi News Vegetables in the city will be closed immediately, traders will go on a hunger strike from January 1